SIP Investment  saam tv
बिझनेस

SIP Investment : १० हजारांच्या गुंतवणुकीतून १ कोटींचा फंड; पाहा संपूर्ण गणित

SIP Crorepati : दरमहिन्याला १० हजार रुपयांची SIP सुरू करून दरवर्षी १० टक्क्यांनी गुंतवणूक वाढवून तुम्ही मोठा फंड तयार करू शकता.

Sakshi Sunil Jadhav

सध्या शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे म्युच्युअल फंडातल्या गुंतवणूकदारांच्या मनातही चिंतेचं वातावरण आहे. मात्र, बाजारातल्या घसरण पाहून घाबरून SIP बंद करण्याचा निर्णय घेणं योग्य ठरेलच असं नाही. दीर्घकालीन गुंतवणुकीत संयम आणि सातत्य महत्त्वाचं मानलं जातं. विशेष म्हणजे, दरमहिना फक्त १० हजार रुपयांची SIP सुरू करून आणि दरवर्षी गुंतवणुकीत ठरावीक वाढ करून तुम्ही १ कोटी रुपयांचा फंड उभारण्याचं लक्ष्य ठेवू शकता. यासाठी स्टेप-अप SIP आणि कंपाउंडिंगचा फॉर्म्युला समजून घेणं महत्त्वाचं आहे.

बाजारातल्या चढ-उतारात SIP बंद करू नका

शेअर बाजारात तेजी-मंदी सुरूच असते. जागतिक घडामोडी, युद्धजन्य परिस्थिती आणि आर्थिक अनिश्चिततेचा परिणाम बाजारावर होतो. अशा परिस्थितीत अनेक गुंतवणूकदार घाबरून आपली SIP थांबवतात. मात्र, दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणाऱ्यांनी घाईघाईने निर्णय घेणं टाळा. आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार गुंतवणूक सुरू ठेवणं फायदेशीर ठरू शकते.

काय आहे स्टेप-अप SIP?

स्टेप-अप SIP म्हणजे दरवर्षी आपल्या मासिक गुंतवणुकीत ठरावीक टक्क्यांनी वाढ करणे. उदाहरणार्थ, तुम्ही सुरुवातीला दर महिन्याला १० हजार रुपयांची SIP सुरू केली आणि दरवर्षी त्यात १० टक्क्यांनी वाढ केली, तर कालांतराने तुमची गुंतवणूक वाढत जाते. उत्पन्न वाढल्यानुसार गुंतवणूक वाढवण्याचा हा एक पर्याय आहे.

१० हजारांच्या SIP मधून १ कोटींचे गणित

समजा, तुम्ही दर महिन्याला १० हजार रुपयांची SIP सुरू केली आणि दरवर्षी त्यात १० टक्क्यांनी वाढ केली. २० टक्के वार्षिक परताव्याचे गृहीतक धरल्याने १३ ते १४ वर्षांत १ कोटी रुपयांपेक्षा जास्त फंड जमा होण्याची शक्यता आहे.

पहिल्या वर्षी - दरमहा १०,००० रुपये गुंतवणूक.

पाचव्या वर्षी - मासिक SIP सुमारे १४,६४१ रुपये.

दहाव्या वर्षी - मासिक SIP सुमारे २३,५७९ रुपये.

चौदाव्या वर्षी - मासिक SIP सुमारे ३४,००० रुपये.

या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा आणि अंतिम फंड हा गुंतवणुकीच्या वेळेनुसार व बाजारातील कामगिरीनुसार बदलू शकतो.

२० टक्के परतावा मिळण्याची खात्री नाही!

महत्त्वाचे म्हणजे, वरील गणित हे २० टक्के वार्षिक परताव्याच्या काल्पनिक गृहीतकावर आधारित आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. २० टक्के परतावा मिळेलच याची कोणतीही हमी नाही. प्रत्यक्ष परतावा कमी किंवा जास्त असू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing Case: अमेरिकेतील हॅलोविनच्या उत्सवाला हिंसाचाराचं गालबोट; गोळीबारात ६ जणांचा मृत्यू १५ जण जखमी

Director Injured: मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी; प्रसिद्ध दिग्दर्शकाला लागली गोळी, रुग्णालयात दाखल

१५५ ग्रॅम MD, दोन आयफोन आणि दोन आरोपी; मुंबई पोलिसांनी उधळला डाव

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा न्यायालयाल बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Blood Sugar : गोड पदार्थ खाणं बंद करूनही रक्तातील साखर वाढतेय? रोजच्या 'या' ५ सवयी ठरतायत जीवघेण्या

SCROLL FOR NEXT