Silver Rate Saam Tv
बिझनेस

दिवाळीनंतर सर्वसामान्यांची 'चांदी'; दरात ३५ हजारांची घसरण, सोन्याच्या भावातही घट होणार?

Silver Price Crashes; Will Gold Follow: दिवाळीपूर्वी सोनं अन् चांदीच्या भावात मोठी वाढ झाली होती. दरम्यान, चांदीच्या किमतीत केवळ १० दिवसांत ३५ हजारांची घट झाली आहे.

Bhagyashree Kamble

धनत्रयोदशी आणि दिवाळीपूर्वी सोनं अन् चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली. हा चढता आलेख अनेक दिवस टिकला. २४ कॅरेट १ तोळं सोन्यानं १ लाख ३० हजार रूपयांचा टप्पा पार केला होता. चांदीनेही १ लाख ९० हजार रूपयांची पातळी गाठली. मात्र, आता चांदीच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. चांदीच्या किमतीत घट झाल्यामुळे सराफाच्या दुकानात ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली.

१६ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान, चांदीच्या किमतीत अंदाजे ३५ हजाराची घट झाली. आज भारतात १०० ग्रॅम चांदीची किंमत अंदाजे १५,५०० आहे. तर, १ किलो चांदीची किंमत अंदाजे १५५,००० इतकी आहे. चांदीच्या किंमतीत झालेल्या घसरणीमुळे सराफाच्या बाजारात ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली.

सोन्याच्या भावातही घट होईल का?

दिवाळीत सोन्याच्या भावात चढ उतार पाहायला मिळाली. धनत्रयोदशीला सोन्याच्या दरात कमालीची घसरण झाली. नंतर सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे. आज भारतात २४ कॅरेट सोनं प्रति ग्रॅम १२५ रूपयांनी कमी झाले आहे. १ ग्रॅम सोनं खरेदीसाठी आपल्याला १२,५६२ रूपये मोजावे लागतील.

त्याचप्रमाणे २२ कॅरेट सोनं ११५ रूपयांनी कमी झाले आहे. प्रति ग्रॅम सोनं खेरदीसाठी आपल्याला ११,५१५ रूपये मोजावे लागतील. सोन्याच्या दरात आणखी घट होईल का? हे पाहणं आता महत्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपूर महानगरपालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार

Horoscope benefits: आजच्या दिवशी कुणाला मिळणार लाभ? पाहा २९ डिसेंबरचं पंचांग आणि राशीभविष्य

Pune Politics: पुण्यात काँग्रेस-शिवसेना अन् मनसे एकत्र निवडणूक लढवणार, जागा वाटपाचा तिढा सुटला; आज होणार घोषणा

Januray 2026 Gochar: जानेवारीत मकरसह ३ राशी होणार मालामाल; 4 ग्रह करणार त्यांच्या राशीत बदल

Success Story: सलग १० वेळा नापास, आईचे दागिने गहाण ठेवले; जिद्दीने क्रॅक केली UPSC; सिद्धार्थ सक्सेना यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT