Share Market Update  Saam Tv
बिझनेस

Sensex Closing Today: शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्सने घेतली 122 अंकांनी उसळी, नेस्लेचे गुतंवणूकदार झाले मालामाल

Share Market Closing Bell Today: मंगळवारच्या व्यवहारानंतर शेअर बाजारात काही प्रमाणात उसळी पाहायला मिळाली. शेअर बाजारात सेन्सेक्सने १२२ अंकानी उसळी घेऊन ७१४३७ अंकावर स्थिरावला.

Vishal Gangurde

Closing Bell Today:

मंगळवारच्या व्यवहारानंतर शेअर बाजारात काही प्रमाणात उसळी पाहायला मिळाली. शेअर बाजारात सेन्सेक्सने १२२ अंकानी उसळी घेऊन ७१४३७ अंकावर स्थिरावला. तर निफ्टी २७ अंकानी उसळी घेऊन २१,४४६ अंकावर स्थिरावला. आजच्या व्यवहारात नेस्ले इंडियाच्या शेअरचा टॉप गेनरमध्ये सामावेश झाला. (Latest Marathi News)

मीडिया रिपोर्टनुसार, मंगळवारी शेअर बाजारातील व्यवहारात टॉप गेनरमध्ये नेस्ले इंडिया, कोल इंडिया, टाटा कंज्यूमर आणि एनटीपीसीचा शेअरचा सामावेश झाला. तर आज शेअर बाजारात एसबीआय लाइफ, हीरो मोटोकॉर्प, अडानी पोर्ट्स आणि विप्रोच शेअर घसरल्याचे दिसून आले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेअर बाजारात सेन्सेक्सने घेतली उसळी

शेअर बाजारात दिवसभराच्या कामकाजात सेन्सेक्सने दिवसभरात एकदा अडीचशेपर्यंत उसळी घेतली होती. तर मंगळवारी निफ्टीने पहिल्यांदा २१,५०० पर्यंतच्या पातळीवर पोहोचण्याचा प्रयत्न केला.

गौतम अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण

मंगळवारी गौतम अदानी ग्रुपच्या नऊ लिस्टेड कंपन्यांपैकी ७ कंपन्यांच्या शेअरने फारशी उसळी घेतली नाही. तर अदानी ग्रीन एनर्जी आणि एनडीटीव्हीच्या शेअरने उसळी घेतली. तसेच मंगळवारी अंबुजा सिमेंट, अदानी टोटल गॅस, अदानी पॉवर, अदानी विल्मर,एसीसी, अदानी एंटरप्राइजेज आणि अदानी पोर्ट्सचे शेअर घसरल्याचे दिसून आलं.

मल्टीबॅगर रिटर्न देणाऱ्या कंपन्यांपैकी टाटा मोटर्स, स्टोव्ह क्राफ्ट, महिंद्रा अँड महिंद्रा, जियो फायनान्शियल, पटेल इंजिनिअरिंग आणि युनी पार्ट्स इंडियाचे शेअर घसरल्याचे दिसून आले. तर दिवसभरात एक्साइड इंडस्ट्रीज, कामधेनू लिमिटेड, ब्राँड कॉन्सेप्ट, ओम इन्फ्रा आणि देवयानी इंटरनॅशनलचे शेअर उसळी घेऊन स्थिरावले.

एलआयसीच्या शेअरमध्ये घसरण

मंगळवारी गल्फ ऑइल, हजूर मल्टी प्रोजेक्ट, इरेडा, आयसीआयसीआय बँक, केमबॉन्ड केमिकल आणि सर्व्होटेक पॉवर सिस्टमच्या शेअरमध्ये उसळी पाहायला मिळाली. तर पंजाब नॅशनल बँक, गेल इंडिया, साऊथ इंडियन बँक आणि एलआयसीचे शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जन मिरवणुकीत आमदार सतेज पाटील यांचा डान्स

Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये भारताची फायलनमध्ये धडक; विरोधीला संघाला पाणी पाजलं

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT