Share Market Opening Saam Tv
बिझनेस

Share Market Opening: शेअर मार्केट उघडताच सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; कोेणते शेअर्स ठरले टॉप गेनर्स? वाचा

Share Market Today 20th August: आज सकाळी (२० ऑगस्ट) शेअर मार्केट उघडताच निफ्टी आणि सेनसेक्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. त्यामुळे अनेक शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली आहे.

Siddhi Hande

आज सकाळी शेअर मार्केट उघडताच स्टॉक्समध्ये चांगलीच तेजी होताना दिसत आहे. आज सकाळी सेनसेक्स (Sensex)२२५ अंकाच्या वाढीसह उघडला आहे तर निफ्टीमध्ये ६० अंकाची वाढ झाली आहे. बँक निफ्टी ७८ अंकाच्या वाढीसह उघडला आहे. तर निफ्टी (Nifty) ५० चे ४८ शेअर्स हिरव्या रंगात म्हणजेच तेजीत व्यव्हार करत आहे. (Share Market Today)

आज शेअर मार्केटमध्ये BSE Sensex २०७.४७ अंकाच्या वाढीसह ८०,६३२.१५ टक्क्यांवर उघडला होता. तर एनएसई निफ्टी (NSE Nifty) मध्ये ६१.५० अंकानी वाढ होऊन २४,६३४.२० अंकांवर व्यव्हार करत आहे. सकाळी १०.१० मिनिटांनी सेन्सेक्स ४६६.१६ अंकानी वाढून ८०,८९०.८४ वर व्यव्हार करत होते. तर निफ्टी १४१.९५ अंकाच्या वाढीसह २४,७१४.६० रुपयांवर व्यव्हार करत होते.

आज सकाळी शेअर मार्केट उघडताच बीपीसीएल (BPCL), हिरो मोटकॉर्प (Hero Motocorp), टिसीएस (TCS),इंडसइंड बँक (Indusland Bank),अल्ट्राटेक सिमेंट (Ultratech Cement)च्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. तर ओएनजीसी (ONGC), भारती एअरटेल(Bharti Airtel),सिप्ला (Cipla),एचसीएल टेक(Hcl Tech), आयटीसी (ITC) शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली आहे.

टीप - शेअर बाजारात गुंतवणूक करण्याआधी मार्केट तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT