Share Market Latest News in Marathi  Saam TV
बिझनेस

Share Market News: शेअर बाजारात जबरदस्त तेजी; सेन्सेक्स-निफ्टीच्या उसळीने गुंतवणुकदारांचा फायदाच फायदा

Stock Market News: आठवड्याच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह सुरू झालं. शेअर बाजारात तेजी येताच गुंतवणुकदारांची मोठी चांदी झाली.

Satish Daud

Stock Market News Today

आठवड्याच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी भारतीय शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह सुरू झालं. सोमवारी (२२ डिसेंबर) राम मंदिराचे लोकार्पण असल्याने भारतीय शेअर बाजार बंद ठेवण्यात आला होता. मंगळवारी मार्केट खुलताच बीएसई सेन्सेक्स 600 अंकांच्या वाढीसह 71960 वर उघडला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सेन्सेक्सपाठोपाठ निफ्टी 50 मध्येही वाढ झाल्याचं पहायला मिळालं. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 21732 अंकांवर उघडला. शेअर बाजारात (Share Market) तेजी येताच गुंतवणुकदारांची मोठी चांदी झाली. दुसरीकडे एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक, मारुती, आणि एचयूएल बँकांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

सोनी ग्रुपने झीच्या भारतीय युनिटमध्ये 10 अब्ज डॉलर्सचा विलीनीकरण रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर झी एंटरटेनमेंटचे समभाग 10% टक्यांनी घसरणीसह उघडले. त्यामुळे गुंतवणुकदारांचे हजारो डॉलर्स बुडाले. (Latest Marathi News)

दरम्यान, आठवड्याच्या सुरुवातीच्या व्यवहारात ICICI बँकेचे शेअर्स 5% वाढले. डिसेंबर तिमाहीत बँकेने अपेक्षेपेक्षा चांगली कमाई नोंदवल्यानंतर ही वाढ झाल्याचं दिसून आलं. यामुळे तीनच महिन्यात ICICI बँकेचा तिमाही नफा 23.6% ने वाढून 10,272 कोटी रुपये इतका झाला.

तज्ज्ञांच्या मते, अयोध्या येथे नुकत्याच झालेल्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यामुळे जागतिक आणि देशांतर्गत बाजारात पुढील काही दिवस तेजी येण्याची शक्यता आहे. अल्पावधीतच शेअर बाजार मोठा विक्रम नोंदवणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, पश्चिम आशिया आणि लाल समुद्रातील तणावामुळे गुंतवणुकदारांनी सावध राहावे, असा सल्लाही देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dangerous Diet Foods : डायटिंग करताय ? हे ३ पदार्थ तुमच्या जीवावर बेतू शकतात.

Maharashtra Live News Update : बोलताना भान ठेवा, अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे कान टोचले

बसने स्कूटीस्वार तरुणीला चिरडले; घटनास्थळीच मृत्यू; सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर

Maharashtra Politics : निवडणूका जिंका, महामंडळ मिळवा! चंद्रशेखर बावनखुळे नेमके काय म्हणाले ? | VIDEO

ITR Filling 2025: आयकर विभागाचा मोठा निर्णय! आयटीआर रद्द झाला तरीही पुन्हा मिळणार संधी, खात्यात जमा होणार रिफंड

SCROLL FOR NEXT