Share Market  ANI
बिझनेस

Share Market News: गुंतवणूकदारांचे बुडाले ७ लाख कोटी रुपये; जाणून घ्या का कोसळला शेअर बाजार?

Share Market News : आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. गुंतवणूकदारांचे ७ लाख कोटी रुपयांचे बुडाले आहेत. आज बीएसई स्मॉलकॅप, मिडकॅप आणि लार्जकॅपमध्ये लक्षणीय घट नोंदवण्यात आली. प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्येही घसरण झाली. देशांतर्गत शेअर बाजारातील घसरणीचे सर्वात मोठे कारण म्हणजे नफावसुली.

Bharat Jadhav

Share Market News Investors Lost 7 Lakh Crore :

देशांतर्गत शेअर बाजारात आज नफावसुलींचा बोलबाला राहिला.विदेशी बाजारातील संमिश्र ट्रेंडदरम्यान गुंतवणूकदारांनी समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री केली.घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे ७ लाख कोटी रुपये बुडाले. बीएसई स्मॉलकॅप ३.१६ टक्क्यांनी घसरला. तसेच मिडकॅपमध्ये २.६२ टक्के आणि लार्जकॅपमध्ये ०.९० टक्के घसरण नोंदवण्यात आली.(Latest News)

आज प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्येही घसरण झाली. बीएसईच्या ३० शेअर असलेल्या सेन्सेक्स ५२३ अंकांनी म्हणजेच ०.७३ टक्क्यांनी घसरत ७१०७२.४९ अंकांवर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टीही १७०.०५ अंकांनी ०.७८ टक्क्यांनी खाली येत २१,६१२.४५ वर बंद झाला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्यवहारादरम्यान सेन्सेक्स ७०९२२.५७ या नीचांकी पातळीवर आला होता. सेन्सेक्समधील ३० पैकी २२ समभाग नुकसानासह बंद झाले. तर निफ्टी ५० च्या ३४ समभागांना घसरण पाहावी लागली. सेन्सेक्स समुहात समाविष्ट असलेल्या कंपन्यांमध्ये एनटीपीसी, टाटा स्टील, एसबीआय आणि इंडसइंड बँकांना मोठे नुकसान सोसावे लागले.

ुसरीकडे विप्रो, एचसीएल टेक, महिंद्रा अँड महिंद्रा आणि नेस्ले यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले. नफावसुलीमुळे बीएसई स्मॉलकॅप ३.१६ टक्क्यांनी घसरला. तर मिडकॅप २.६२ टक्क्यांनी घसरला. तसेच लार्जकॅप निर्देशांकात ०.९० टक्क्यांची घसरण झाली. परदेशी बाजारातही चढउतार पाहायला मिळाला.

अशियातील इतर बाजारातील जापानच्या निक्की आणि चीनच्या शंघाय कम्पोजिट वधारत बंद झाला. तर हाँगकाँगचा हँग सेंगमध्ये घसरण दिसली. युरोपातील बाजारात संमिश्र कल दिसून आला. फ्रान्स आणि जर्मनीच्या बाजारात तेजीचे वातावरण होते. तर लंडन एक्सचेंजमध्ये आज घसरण राहिली.

या दरम्यान आंतरराष्ट्रीय तेल मानक ब्रेंट क्रूड ०.५० टक्क्यांनी घसरून ८१.७८ डॉलर प्रति बॅरलवर आले. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) १४१ .९५ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. शुक्रवारी सेन्सेक्स १६७.०६ अंकांच्या वाढीसह ७१,५९५ .४९ अंकांवर आणि निफ्टी ६४.५५ अंकांच्या वाढीसह २१,७८२.५० अंकांवर बंद झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Viral Video: पेट्रोल पंपावर महिलांचा राडा, आधी चप्पल फेकून मारली, नंतर जमिनीवर आपटलं!

Chakli Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत चकली, जाणून घ्या सोपी आणि जलद रेसिपी

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

SCROLL FOR NEXT