भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाचा फटका शेअर बाजाराला बसलाय. आठवड्याच्या अखेरच्या दिवसी शेअर्स मार्केटमध्ये मोठी घसरण झालीय. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी रुपये बुडाले आहेत. बाजाराची सुरुवात चांगली झाली होती, पण काही वेळातच शेअर्सची विक्री वाढली. आजच्या व्यवहारात, सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकात घसरण झाली. आज मार्केट रेड फ्लॅगमध्ये होता. गुंतवणूकदार सतर्क झाले असून त्यांनी शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री केली.
आज सेन्सेक्समध्ये सुमारे १००० अंकांची घसरण दिसून आली. तर निफ्टीमध्ये सुद्धा ३३५ अंकांनी खाली आलाय. आज, निफ्टीवर बँक, फायनान्शियल, आयटी, एफएमसीजी, मेटल, फार्मा, ऑटो आणि रिअल्टी निर्देशांक रेड फ्लॅगमध्ये होता.
दरम्यान कालपासून शेअर बाजारात विक्री वाढलीय. बीएसई सेन्सेक्स ३०० अंकांपेक्षा जास्त अंकांनी खाली येत ७९,८०१ वर बंद झाला होता. यासह एनएसई निफ्टीमध्ये साधरण १०० अंकांनी घसरत २४,२४६ अंकांवर बंद झाला होता. आज मीडिया सेक्टरमधील शेअर्स कमकूवत दिसत होते. वारंवार खरेदीनंतर आज बाजारात घसरण झालेली दिसली.
मार्च तिमाहीचे निकाल – काल, २४ एप्रिल रोजी, अनेक मोठ्या कंपन्यांचे मार्च तिमाहीचे निकाल जाहीर झालेत. यामध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले सारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश होता. या कंपन्यांचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले नाहीत. त्यामुळे आज शेअर्स विक्री दिसून येत आहे.
शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून खरेदीचे वातावरण होते. ज्यामुळे गुंतवणूकदार आज शेअर्स विकत आहेत. यामुळेच बाजारात सतत विक्री सुरू आहे. बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमकूवत उत्पन्न आणि परदेशी गुंतवणूकदारांनी काही प्रमाणात बाजारातून पैसे काढून घेतले.
गुंतवणूकदारांकडून प्रॉफिट बुकिंग
भारतीय इक्विटी आणि बाँड बाजारात व्हॅल्युनेशनची चिंता
२२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढलाय. भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. या संघर्षांमुळे परदेशी गुंतवणूकदारांना धक्का बसलाय.
दक्षिण आशिया विकास अहवाल टॅक्सिंग टाईम्समध्ये, २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी विकास दर ६.५ टक्के राहण्याचा अंदाज होता. तर या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला हा विकास दर ६.७ टक्के मानला जात होता. आता हा अंदाज अहवाल कमी करण्यात आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.