Share Market Closing Update Saam Tv
बिझनेस

Share Market News: गुंतवणूकदारांसाठी शेअर बाजारातील आजचा दिवस ठरला काळा, काही तासांतच तब्बल 2.5 लाख कोटी बुडाले...

Share Market Closing Update: गुंतवणूकदारांसाठी शेअर बाजारातील आजचा दिवस ठरला काळा, काही तासांतच तब्बल 2.5 लाख कोटी बुडाले...

Satish Kengar

Share Market Closing Update in Marathi:

शेअर बाजारातील आज दिवस गुंतवणूकदारांसाठी काळा ठरला आहे. आज भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स जवळपास ८०० अंकांनी घसरला. तर निफ्टी १९,९०० च्या जवळपास घसरला.

त्यामुळे आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे सुमारे अडीच लाख कोटी रुपये बुडाले. युटिलिटी आणि पॉवर वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकही बुधवारी तोट्यात राहिले. कमोडिटी, फायनान्शिअल, मेटल आणि रियल्टी शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली.

व्यवहाराच्या शेवटी ३० शेअर्सचा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्स ७९६.०० अंक म्हणजेच १.१८ टक्क्यांनी घसरून ६६,८००.८४ वर बंद झाला. तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) ५० शेअर्सचा निर्देशांक निफ्टी २२२.८५ अंक म्हणजेच १.११ टक्क्यांनी घसरला आणि १९,९१०.४५ च्या पातळीवर बंद झाला. (Latest Marathi News)

गुंतवणूकदारांचे २.३४ लाख कोटी रुपये बुडाले

बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज २० सप्टेंबर रोजी ३२०.६६ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच सोमवार, १८ सप्टेंबर रोजी ३२३.०० लाख कोटी रुपये होते.

तसेच बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे २.३४ कोटी रुपयांनी कमी झाले आहे. यालाच दुसऱ्या शब्दांत बोलायचे झाले तर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे २.३४ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT