Financial Influencers Saam Tv
बिझनेस

Financial Influencers: सोशल मीडियावर आर्थिक सल्ले देणाऱ्यांची खैर नाही; फायनान्शियल इन्फ्लुएनर्संवर सेबी लावणार लगाम

SEBI: सोशल मीडियावर आर्थिक सल्ले देणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलीय. परंतु सोशल मीडियावर आर्थिक सल्ले देणाऱ्यांपैकी अनेकांकडे कोणतीच पदवी नाहीये. पण यांच्या प्रभावाखाली येत अनेकजण नको त्या ठिकाणी पैशांची गुंतवणूक करतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Financial Influencers:

गेल्या काही दिवसांपासून इन्फ्लुएनर्सची संख्या दिवसेंदिवस वाढू लागलीय. आरोग्य, वित्तीय सल्ला, पर्यटन, कुकिंग याविषयांवर माहिती देणारे असंख्य इन्फ्लुएनर्स (Influencer) सोशल मीडियावर (Social Media)आहेत. त्यात सर्वाधिक मोठी संख्या ही फायनान्शिअल इन्फ्लुएनर्सची (Financial Influencers)आहे. (Latest News On Business)

सोशल मीडियावर आर्थिक सल्ले देणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलीय. परंतु सोशल मीडियावर आर्थिक सल्ले देणाऱ्यांपैकी अनेकांकडे कोणतीच पदवी नाहीये. पण यांच्या प्रभावाखाली येत अनेकजण नको त्या ठिकाणी पैशांची गुंतवणूक (Investment)करतात आणि आर्थिक नुकसानाला सामोरे जातात. याचमुळे सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (Securities and Exchange Board of India) म्हणजेच सेबी या इन्फ्लुएनर्सवर लगाम लावणार आहे.

हे इन्फ्लुएनर्स डिजीटल मीडिया, चॅनल्सच्या माध्यामातून लोकांना गुंतवणुकीचा सल्ला देतात. फायनान्शिअल इन्फ्लुएनर्स सोशल मीडियावर पोस्ट करण्याकरीता ७.५ लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारतात. आपल्या पोस्टच्या माध्यामातून इन्फ्लुएनर्सर लोकांवर प्रभाव टाकत त्यांचा गुंतवणुकीचा निर्णय बदलण्यास भाग पाडत असतात.

दरम्यान काही इन्फ्लुएनर्स हे योग्य आणि चांगली माहिती लोकांना देत असतात. परंतु अनियंत्रित इन्फ्लुएनर्स चुकीची माहिती देत आर्थिक धोका निर्माण करू शकतात. यामुळे यांच्यावर सेबी नजर ठेवणार आहे. यामुळे या इन्फ्लुएनर्सला सेबीच्या नियमांतर्गत यावं लागणार आहे. सेबीच्या या पाऊलामुळे गुंतवणूकदारांना योग्य निष्पक्ष माहिती मिळू शकेल.

यामुळे कोणत्याही प्रकारच्या आर्थिक धोक्यांपासून गुंतववणूकदारांचा बचाव होईल, अशी माहिती आनंद राठी वेल्थचे सीईओ फिरोज अझिझ यांनी माध्यामांना दिलीय. सोशल मीडियावर गुंतवणुकीच्या सल्ला देण्याआधी इन्फ्लुएनर्सला सेबीची परवानगी घ्यावी लागेल. सेबीकडे त्यांनी नोंदणी करावी लागेल. सेबीच्या मार्गदर्शक तत्वांचं पालनही यांना करावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - मुंबई महापालिका निवडणूकीसाठीच्या मतदारयादीसंदर्भात धक्कादायक माहिती समोर

Chhattisgarh Encounter : छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई; एनकाउंटरमध्ये ५ नक्षलवाद्यांचा खात्मा, DRG जवान शहीद

Virat Kohli Century: विराट कोहलीचं सलग दुसरं शतक, गौतम गंभीरची रिअ‍ॅक्शन व्हायरल

Vasai-Virar: वसई-विरारमध्ये भाजपची ताकद वाढली, बड्या नेत्यांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश

Glowing Skin Care Tips: दिवसभरच्या थकव्यामुळे चेहरा काळवंडलाय? या सोप्या टिप्स फॉलो करा

SCROLL FOR NEXT