SBI Scheme Google
बिझनेस

SBI Scheme: SBI च्या ५ जबरदस्त योजना! फक्त ४४४ दिवसांमध्ये गुंतवणूकदार होणार श्रीमंत

SBI Top 5 FD Scheme: स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनेअंतर्गत ग्राहकांना भरघोस व्याजर मिळते.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. यात लोक अनेक योजना किंवा एफडीमध्ये गुंतवणूक करतात. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काही योजना आहेत ज्यात गुंतवणूक केल्यावर तुम्हाला भरघोस व्याजदर मिळते. स्टेट बँक ऑफ इंडियाने अमृत वृष्टी नावाने फिक्स्ड डिपॉझिट योजनेची सुरुवात केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या स्कीमवर ग्राहकांना चांगले व्याजदर मिळते.

एसबीआय अमृत कलश

एसबीआय अमृत कलश योजना ही ४०० दिवसांसाठी आहे. यात सर्वसामान्य नागरिकांना ७.१० टक्के व्याजदर मिळते. तर ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याजदर मिळते. या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२४ आहे.

एसबीआय वीकेयर

एसबीआय वीकेअर योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. यामध्ये तुम्हाला नियमित व्याजदरावर ५० बेसिस पॉइंटचे व्याज मिळते. ही योजना जमा आणि रिन्यू या दोघांवरही उपलब्ध आहे. या योजनेची वॅलिडिटी ३० सप्टेंबर २०२४ आहे.

एसबीआय अमृत वृष्टी योजना

स्टेट बँक ऑफ इंडियाची अमृत वृष्टी योजना ही ४४४ दिवसांसाठी आबे. या योजनेत सर्वसामान्य नागरिकांना ७.२५ टक्के व्याज मिळते. तर ज्येष्ठ नागरिकांना ०.५० टक्के अतिरिक्त व्याज मिळते. या योजनेची वॅलिडिटी ३१ मार्च २०२५ आहे.

एसबीआय सर्वोत्तम योजना

एसबीआय सर्वोत्तम योजनेत सर्वाधिक व्याजर मिळते. ही एक एफडी पॉलिसी आहे. या योजनेत २ वर्षांच्या कालावधीसाठी ७.४ टक्के व्याज मिळते. १ वर्षांच्या कालावधीसाठी ७.१० टक्के व्याजदर मिळते. तर ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त ०.५० टक्के व्याजदर मिळते.

एसबीआय ग्रीन रुपी टर्म डिपॉझिट

एसबीआयने पर्यावरणासाठी ग्रीन रुपी टर्म डिपॉझिट योजना राबवली आहे. ही योजना ११११ किंवा १७७७ दिवसांसाठी योजना राबवली आहे. २२२२ दिवसांसाठी ६.४० टक्के व्याजदर मिळते. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.४० टक्के व्याजदर मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

SCROLL FOR NEXT