SBI Home Loan Saam tv
बिझनेस

SBI Home Loan: खुशखबर! होम लोन झालं स्वस्त, स्टेट बँकेचा मोठा निर्णय! तुमचे किती रुपये वाचणार?

SBI Home Loan Fall: रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केली आहे. त्यानंतर आता स्टेट बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. स्टेट बँकेने ECLR रेटमध्ये कपात केली आहे.

Siddhi Hande

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मागच्या आठवड्यात ग्राहकांना खुशखबर दिली होती. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी करुन दिलासा दिला होता. रेपो रेट कमी झाल्यानंतर आपोआप कर्जावरील व्याजदर कमी होते, ईएमआय कमी होतो. दरम्यान, आता स्टेट बँक ऑफ इंडियाने मोठी घोषणा केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने लेंडिंग रेट्समध्ये कपात केली आहे.

रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये ५० बेसिस पॉइंट्सने कपात केली होती. त्यानंतर आता स्टेट बँकेनेही लेंडिंग रेट्समध्ये ५० बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे. याआधी बँक ऑफ बडोदानेही आपल्या व्याजदरात कपात केली होती. यामुळे आता होम लोन स्वस्त होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे हे नवे दर उद्यापासून म्हणजे १५ जूनपासून लागू होणार आहे.

होम लोन कितीने स्वस्त झाले? (How Much Home Loan Cheaper)

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या होम लोन घेणाऱ्यांचा CIBIL स्कोर ७.५० ते ८.४५ पर्यंत आहे. स्टेट बँकेच्या होम लोनचे व्याजदर ७.७५ ते ८.७० मध्ये आहे. आता या होम लोनच्या व्याजदरात कपात झाली आहे.

स्टेट बँकेचे होम लोन एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिग रेट (EBLR) शी जोडलेले असतात. सध्या EBLR ८.१५ टक्के आहे. हे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे असते. त्यांच्या कर्जाची रक्कम, लोन यावर अवलंबून असते.

स्टेट बँक ऑफ इंडियाने एक्सटर्नल बेंचमार्ग लेंडिंग रेट (EBLR) ८.६५ ते ८.१५ पर्यंत केले आहेत. यामध्ये वेगवेगळ्या होम लोनसाठी वेगवेगळे व्याजदर आहेत.

MCLR मध्ये बदल नाही

१४ जून २०२५ पर्यंत स्टेट बँकेने MCLR मध्ये कोणताही बदल केलेला नाही. ओवरनाइट किंवा एका महिन्यासाठी MCLR रेट ८.२० टक्के आहे. तर तीन महिन्यासाठी ८.५५ टक्के आहे. ६ महिन्यासाठी ८.९० टक्के आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ओमराजे सध्या कोर्टात हजर

Cancer symptoms: शरीरात ही ५ मोठी लक्षणं दिसली तर असू शकतो कॅन्सरचा ट्यूमर

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

International Yoga Day : योगा करण्यापूर्वी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामे, निष्काळजीपणा पडेल महागात

SCROLL FOR NEXT