SBI Fixed Deposit Scheme Saam TV
बिझनेस

Fixed Deposit Scheme: SBI ची 400 दिवसांची जबरदस्त FD योजना, दरवर्षी व्याजातून मिळणार इतके पैसे...

Best Investment Plan: SBI ची 400 दिवसांची जबरदस्त FD योजना, दरवर्षी व्याजातून मिळणार इतके पैसे...

साम टिव्ही ब्युरो

SBI Fixed Deposit Scheme: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) यावर्षी फेब्रुवारीमध्ये 'अमृत कलश'  (Sbi Amrit Kalash Fd)  नावाची मुदत ठेव (FD) योजना सुरू केली. ही योजना यापूर्वी केवळ 31 मार्च 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुली होती. मात्र नतंर पुन्हा याला मुदतवाढ देण्यात आली.

आता ही योजना 15 ऑगस्टपर्यंत गुंतवणुकीसाठी खुली आहे. जर तुम्हीही मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही अमृत कलश योजनेचा पर्याय निवडू शकता. 400 दिवसांच्या या योजनेत बँक गुंतवणुकीवर सात टक्के दराने व्याज देत आहे.

एसबीआयच्या वेबसाइटनुसार, बँक 400 दिवसांच्या विशेष मुदत ठेवीवर 7.10 टक्के दराने व्याज देईल. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के दराने व्याज मिळणार आहे. ही योजना 15 ऑगस्टपर्यंत गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहे. (Latest Marathi News)

जर सामान्य गुंतवणूकदारांनी या योजनेत 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना व्याज म्हणून वार्षिक 8,017 रुपये मिळतील. तसेच ज्येष्ठ नागरिकांना व्याज म्हणून वार्षिक 8,600 रुपये मिळतील. ही योजना 400 दिवसांत मॅच्युअर होईल. म्हणजेच या योजनेत तुम्हाला 400 दिवसांची गुंतवणूक करावी लागेल.

तुम्ही व्याजाची रक्कम कधी घेऊ शकता

अमृत ​​कलश योजनेत गुंतवणूक करणारे मासिक, त्रैमासिक आणि अर्धवार्षिक आधारावर व्याज घेऊ शकतात. टीडीएस कापल्यानंतर या विशेष एफडी डिपॉझिटवरील मॅच्युरिटी व्याज ग्राहकाच्या खात्यात जमा केले जाईल. आयकर कायद्यांतर्गत लागू दराने TDS लावला जाईल. अमृत ​​कलश योजनेत मुदतपूर्व आणि कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे. ही योजना 12 एप्रिल 2023 पासून गुंतवणुकीसाठी पुन्हा उघडण्यात आली आहे.

किती गुंतवणूक करू शकता

अमृत ​​कलश स्पेशल एफडीमध्ये तुम्ही दोन कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. ही योजना मुदतपूर्व काढण्याची तरतूद आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, अमृत कलश योजनेत गुंतवणूक करण्यासाठी वेगळ्या उत्पादन कोडची आवश्यकता नाही. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही SBI चे Yono बँकिंग अॅप वापरू शकता. याशिवाय शाखेत जाऊनही तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update : राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता, कुठे कोणता अलर्ट? वाचा सविस्तर

अजित पवारांचा शरद पवारांना मोठा धक्का, दौंडचा शिलेदार घड्याळ हातात घेणार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

WhatsApp वर 'Online' दिसणं टाळायचंय? ही सेटिंग बंद करा, फॉलो करा 'हे' टिप्स

Sunday Horoscope Update : चूक केली असेल तर लगेच माफी मागा…; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT