Post Office FD Scheme Saam Tv News
बिझनेस

बायकोच्या नावाने १ लाखांची FD करा; पोस्ट ऑफिसच्या 'या' स्किममधून मिळतील उत्तम रिटर्न्स

Post Office FD Scheme: पोस्ट ऑफिस टीडी योजना बँक एफडीसारखी असून ठराविक व्याज दर देते. पत्नीच्या नावाने गुंतवणूक केल्यास कर बचत आणि जास्त परतावा मिळतो.

Bhagyashree Kamble

  • पोस्ट ऑफिस टीडी योजना बँक एफडीसारखी असून ठराविक व्याज दर देते.

  • पत्नीच्या नावाने गुंतवणूक केल्यास कर बचत आणि जास्त परतावा मिळतो.

  • ५ वर्षांच्या एफडीवर ७.५% व्याज दर मिळेल.

  • खाते उघडण्यासाठी पत्नीचे पोस्ट ऑफिस बचत खाते आवश्यक आहे.

आजकाल प्रत्येकजण पगारातून काही रक्कम बाजूला काढून सेव्हिंग करतो. सेव्हिंगमधून उत्तम व्याजदार मिळावे अशी योजना पाहून आपण गुंतवणूक करतो. गुंतवणुकदार सहसा आरडी, एफडीमध्ये गुंतवणूक करतो. जर आपल्याला पैसे सुरक्षित आणि चांगले रिटर्न्स मिळावे असं वाटत असेल तर, पोस्ट ऑफिसच्या टीडी स्किममध्ये पैसे गुंतवा. पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्यास यातून आपल्याला उत्तम व्याज मिळेल.

पोस्ट ऑफिसची टीडी योजना ग्राहकांसाठी फायदेशीर ठरेल. ही योजना बँकांच्या एफडीसारखी आहे. पोस्ट ऑफिसने एफडीला टीडी म्हणजेच टाइम डिपॉझिट असे नाव दिले आहे. एफडी प्रमाणेच पोस्ट ऑफिसचे टीडी देखील मॅच्युअर होते. मॅच्युरिटीवर ग्राहकांना संपूर्ण रक्कम निश्चित व्याजासह मिळते.

भारतातील एक मोठा वर्ग त्यांच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक करतो. कर वाचवण्यासाठी काही जण पत्नीच्या नावे विविध योजनांमध्ये गुंतवणूक करतात. आपण पोस्ट ऑफिसच्या या योजनेतही बायकोच्या नावे पैसे गुंतवू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये १ वर्ष ते ५ वर्षांच्या कालावधीत एफडीमध्ये पैसे गुंतवल्यास फायदा होईल. पोस्ट ऑफिस १ वर्षाच्या एफडीवर ६.९ टक्के व्याज देते.

२ वर्षाच्या एफडीवर ७.० टक्के, ३ वर्षांच्या एफडीवर ७.१ टक्के आणि ५ वर्षांच्या एफडीवर ७.५ टक्के व्याज देते. जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावाने पोस्ट ऑफिसमध्ये २ वर्षांसाठी १ लाख रूपये जमा केले. तर, मॅच्युरिटीवर तुमच्या पत्नीच्या खात्यात १,०७,१८५ रूपये जमा होतील.

यामध्ये तुम्हाला जमा केलेल्या १ लाख रूपयांसह ७,१८५ रूपयांचे निश्चित व्याज मिळेल. पत्नीच्या नावावर एफडी मिळवण्यासाठी तुमच्या पत्नीचे पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी, बांगलादेशाने आयात बंदी हटवली

Banana Mask: केसांच्या वाढीसाठी 'असा' करा केळीच्या सालीचा वापर, वाचा हेअर मास्क बनवण्याची सोपी पद्धत

Voter List Scam : हा तर मोठा घोटाळा! मतदार यादीत एकाच महिलेचं ६३ वेळा नाव; कुठे झाला घोळ?

Mumbai Dabbawala: डबेवाल्यांना मुंबईत मिळणार ५०० स्क्वेअर फुटाचं घर

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी सैनिकांना सन्मान, १६ बीएसएफ जवांनाना शौर्य पुरस्कार प्रदान

SCROLL FOR NEXT