व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींचं काम मोबाईल फोनशिवाय होत नाही. वस्तूंची खरेदी विक्री ते ग्राहक आणि पुरवठादाराशी व्यवहार सर्व मोबाईलवर करत असतात. त्यामुळे कामाचा व्याप जास्त असलेल्या व्यक्तींकडे अधिक बॅटरी बॅकअपवाला मोबाईल हवा असतो. जर तुम्ही अशाच मोठ्या बॅटरीवाला मोबाईल घेणार असाल सॅमसंगचा स्मार्टफोन बेस्ट पर्याय आहे. विशेष या नव्या फोनचा बजेट देखील कमी आहे. (Latest News)
Samsung Galaxy F0ची बॅटरी 5000mAh इतकी असून हा फोन तुम्हाला अगदी कमी किमतीत मिळेल. जर तुम्हाला फोन घ्यायचा आहे,पण तुमचा बजेट १० हजारच्या खाली आहे. तर हा फोन तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. सॅमसंगचा 5000mAh बॅटरी फोन तुम्ही ऑनलाइन खरेदी केल्यास तुम्हाला कमी किमतीमध्ये मिळेल.
Samsung Galaxy F04 या फोनची किमत ११४९९ रुपये आहे. परंतु फ्लिपकार्टवर हा फोन ७४९९ रुपयांना देण्यात येत आहे. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवरून Samsung Galaxy F04 स्मार्टफोन खरेदी केल्यास, तुम्ही बँक आणि एक्सचेंज ऑफरद्वारे स्वस्तात फोन खरेदी करू शकता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Samsung Galaxy F04 हा फोन तुम्ही Flipkart Axis Bank कार्डने फोन विकत घेतला तर तुम्हाला ५% कॅशबॅकचा लाभ घेता येईल. ईएमआयवर देखील हा फोन घेता येणार आहे, यासाठी महिन्याचा हप्ता २६४ रुपयांच्या येईल. जर तुम्ही या बँकेच्या डेबिट कार्डने ईएमआयवर हा फोन घेणार असाल तर त्यासाठी महिन्याचा हप्ता हा ४६५ रुपयांचा पडेल.
Samsung Galaxy F04 स्मार्टफोनची वैशिष्ट्ये
Samsung Galaxy F04 स्मार्टफोनला Mediatek Helio P ३५ चं प्रोसेसर देण्यात आले आहे. तर या स्मार्टफोनला ६.५ इंचाचा HD डिस्प्ले देण्यात आलाय. हा स्मार्टफोन ४GB रॅम आणि ६४ GB स्टोरेजसह येतो. तसेच या फोनमध्ये ४GB व्हर्चुअल रॅम देण्यात आलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.