Samsung Galaxy S24 91 mobiles
बिझनेस

Samsung Galaxy S24 Series : काय सांगता! AI फीचरसह मोबाईलला २०० मेगापिक्सलचा कॅमेरा! सॅमसंगचे नवीन स्मार्टफोन्स लॉन्च

Bharat Jadhav

Samsung Galaxy S24 Series :

कोरियन कंपनी सॅमसंगचा यंदाचा सर्वात मोठा इव्हेंट गॅलेक्सी अनपॅक्ड २०२४ कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे होणार आहे. कंपनी या कार्यक्रमात AI अपडेट्स असलेले स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. Samsung Galaxy S24 Series बद्दल मोबाईल प्रेमींमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. Samsung Galaxy S24 Series खूप खास असणार आहे . कारण कंपनी AI फीचर्सला सपोर्ट करणार आहे. याचबरोबर कंपनी थेट चार कलरमध्ये हे फोन्स बाजारात उतरणार आहे.(Latest News)

आयफोन 15 प्रो मॅक्सप्रमाणेच यावेळी गॅलेक्सी एस 24 अल्ट्रामध्ये टायटॅनियम फ्रेम, फ्लॅट डिस्प्ले आणि थिन बेजल्स मिळतील. गॅलेक्सी एस 24 अल्ट्रामध्ये 200 मेगापिक्सेलचा कॅमेराही देण्यात आलाय. रोलंड क्वांडने शेअर केलेल्या माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी S24, S24 प्लस आणि S 24 हे अल्ट्रा ब्लॅक, ब्लू, व्हाईट आणि गोल्ड कलर ऑप्शनमध्ये बाजारात येऊ शकतात. सर्व मॉडेल्समध्ये फ्लॅट डिस्प्ले आणि अल्ट्राला एस-पेन मिळेल. गॅलेक्सी एस 24 सीरिजमध्ये Exynos 2300 या Snapdragon 8 Gen 3 SoC , कमीतकमी 8/12GB जीबी रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात येईल असं सांगितलं जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सॅमसंगच्या स्मार्टफोन सिरीजमध्ये काय नवीन असेल हे जाणून घेण्यास प्रत्येकजण उत्सुक आहेत. आमच्या हाती आलेल्या माहितीनुसार काही नवीन फिचर्स समोर आले आहेत. या सीरिज अंतर्गत ३ स्मार्टफोन लॉन्च केले जातील. त्यापैकी सर्वात खास Samsung Galaxy S24 Ultra असेल. मागील फोनप्रमाणे या मोबाईल फोनमध्ये 200MP कॅमेरा असेल. मात्र यावेळी या सीरीजमध्ये AI चा सपोर्ट मिळणार आहे. कारण यामध्ये Qualcomm ची नवीन चिप दिली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

SCROLL FOR NEXT