Samsung Galaxy A55 5G & Galaxy A35 5G Launched:  Saam Tv
बिझनेस

Samsung Galaxy A55 5G, Galaxy A35 5G भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Samsung Galaxy New Smartphone Launched: आघाडीची मोबाईल उत्पादक कंपनी सॅमसंगने आज भारतात दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. Samsung Galaxy A55 आणि Galaxy A35 अशा या दोन नवीन फोनची नावे आहेत.

Satish Kengar

Samsung Galaxy A55 5G & Galaxy A35 5G Launched:

आघाडीची मोबाईल उत्पादक कंपनी सॅमसंगने आज भारतात दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. Samsung Galaxy A55 आणि Galaxy A35 अशा या दोन नवीन फोनची नावे आहेत. दोन्ही स्मार्टफोनमध्ये FHD+ डिस्प्ले देण्यात आला असून हे दोन्ही Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करता.

हे स्मार्टफोन IP67 रेटिंगसह येतात, जे या फोनला धूळ आणि पाण्यापासून वाचवतात. या स्मार्टफोनमध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.कंपनीने आपले हे दोन्ही फोन भारतात लॉन्च केले असले तरी अद्याप याची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही. स्मार्टफोनची किंमत आणि इतर तपशील 14 मार्च रोजी समोर येणार.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Samsung Galaxy A55 5G चे स्पेसिफिकेशन

Samsung Galaxy A55 मध्ये 1080x2340 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर Exynos 1480 चिपसेटसह 12GB RAM सह येतो. हा स्मार्टफोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये येतो - 128GB आणि 256GB.  (Latest Marathi News)

तुम्ही मायक्रोएसडी कार्डाने याचे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवू शकता. हा ड्युअल सिम स्मार्टफोन Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. Samsung Galaxy A55 मध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा, 5MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा यात मिळतो. या स्मार्टफोनमध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Samsung Galaxy A35 चे स्पेसिफिकेशन

Samsung Galaxy A35 मध्ये Exynos 1380 चिपसेट आणि 8GB RAM देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 1080x2340 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. हा मिड-रेंज सॅमसंग स्मार्टफोन दोन स्टोरेज पर्यायांसह येतो - 128GB आणि 256GB.

Samsung Galaxy A35 मध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड अँगल आणि 5MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 13MP फ्रंट कॅमेरा देखील आहे. या स्मार्टफोनमध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WPL 2025 Retention: महिला प्रीमियर लीगची रिटेन्शन लिस्ट जाहीर,कोणत्या संघांनी कोणत्या खेळाडूंना केलं बाहेर?

Maharashtra Election: मराठा समाजाचा फेव्हरेट पक्ष कोणता? मराठा समाज कुणाचं गणित बिघडवणार?

Assembly Election: नवाब मलिकांच्या प्रचारासाठी अजित पवार मैदानात; भाजपच्या विरोधाला दादांचा ठेंगा

Worli Politics: वरळीत फोडाफोडी, खोक्याचं राजकारण सुरू झालं; मिलिंद देवरा यांची टीका

Suniel Shetty Injury : सुनील शेट्टी जखमी; अॅक्शन सीन करताना दुर्घटना, सेटवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT