Rules Change In April 2024
Rules Change In April 2024  Saam Tv
बिझनेस

Rules Change In April 2024 : एप्रिल महिन्यापासून बदलणार हे ६ नियम, खिशाला बसणार कात्री!

कोमल दामुद्रे

What Will Change From 1st April :

मार्च महिना संपण्यास आणि एप्रिल महिना सुरु होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. नवीन महिना सुरु झाला की, अनेक गोष्टी बदल्या जातात. दर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून अनेक नवे नियम लागू होतात.

आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अनेक गोष्टी बदल्या जाणार आहेत. यामध्ये पैशांच्या (Money) बाबतीत अनेक नियम बदलणार आहेत. ज्याचा सर्वसामान्याच्या खिशावर थेट परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊया आर्थिक नियमांबद्दल (Rules) कसे बदल होतील.

1. एलपीजी गॅस

एलपीजी (LPG) सिलिंडरची किंमत दर महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी देशभरात अपडेट केली जाते. एलपीजीच्या किमतीत १ एप्रिलपासून बदल केले जाऊ शकतात. यापूर्वी लोकासभा निवडणुकांपूर्वी महिलादिनानिमित्त दरात १०० रुपयांनी कपात केली. आता पुन्हा दर बदलतील का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

2. नवीन कर प्रणाली

जर करदात्याने अजूनही कर व्यवस्था निवडली नसेल तर त्याच्याकडे काहीच दिवस उरले आहेत. १ एप्रिलपासून नवीन कर प्रणाली डिफॉल्ट कर म्हणून असेल. या नवीन कर व्यवस्थापनामुळे करदात्याला कर भरावा लागेल.

3. SBI क्रेडिट कार्ड

ज्या वापरकर्त्यांकडे SBI क्रेडिट कार्ड आहे. त्यांच्या कार्डमध्ये १ एप्रिलपासून बदल होणार आहेत. जर तुम्ही SBI क्रेडिट कार्डवरुन रेंट पेमेंट भरत असाल तर तुम्हाला रिवॉर्ड प्वाइंट मिळणार नाही. या नियमाला १ एप्रिलपासून मान्यता मिळेल तर १५ एप्रिलनंतर लागू करण्यात येईल.

4. EPFO नियम

१ एप्रिलपासून EPFO नियमांमध्ये बदल होणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना पुढील महिन्यापासून नवीन नियम लागू करणार आहे. या नियमानुसार आता नोकरी बदल्यानंतर पीएफ खाते ऑटो मोडमध्ये ट्रान्सफर केले जाईल. आता युजरला अकाउंट ट्रान्सफर करण्यासाठी रिक्वेस्ट देण्याची गरज भासणार नाही. हा नियम लागू झाल्यानंतर वापरकर्त्यांच्या अडचणी काही प्रमाणात कमी होईल.

5. पॅन-आधार लिंक

पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पॅनला आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२४ आहे. जर पॅन आधार कार्डशी लिंक नसले तर पॅन क्रमांक रद्द केला जाईल. १ एप्रिलनंतर आधारशी पॅन लिंक केल्यास वापरकर्त्याला १००० रुपये दंड भरावा लागेल.

6. फास्टॅग केवायसी अनिवार्य

१ एप्रिल २०२४ पासून फास्टॅगशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत फास्टॅग केवायसी अपडेट न केल्यास तुम्हाला अधिक समस्यांना सामोरे जावे लागू शकतो. बँक केवायसीशिवाय फास्टॅग पेमेंट केले जाणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact : 'साम'च्या बातमीचा दणका! प्रशासन खडबडून जागं, 15 फेरीवाल्यांवर BMCची कारवाई!

Malegaon Bomb Blast | कथित मालेगाव बॉंम्बस्फोट प्रकरणी आरोपी लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांचा जबाब

Sangeeth Sivan: बॉलिवूडवर शोककळा; दिग्दर्शक संगीत सिवन यांचं निधन

Devendra Fadnavis: शरद पवार म्हणतील तेच उद्धव ठाकरे करतात, देवेंद्र फडणवीस यांचा खोचक टोला

KL Rahul Memes: 'थँक यु आगरकर..',केएल राहुलच्या फ्लॉप शो नंतर नेटकऱ्यांनी अशी घेतली फिरकी

SCROLL FOR NEXT