Rule Change Google
बिझनेस

Rule Change: नवीन वर्षात नवे नियम! LPG ते पेन्शनच्या नियमांत होणार मोठा बदल

Rule Change From 1st January 2025: १ जानेवारी २०२५ पासून अनेक नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. एलपीजी गॅसच्या किंमतीपासून ते पेन्शनबाबतचे नियम बदलले जाणार आहेत.

Siddhi Hande

२०२४ वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. नवीन वर्षात अनेक नियम बदलणार आहे. नवीन वर्षात एलपीजी गॅस सिलिंडरपासून ते यूपीआय पेमेंटपर्यंत सर्व नियम बदलणार आहेत. या नवीन नियमांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

१ जानेवारी २०२५ पासून नवीन नियम लागू होणार आहेत.यामध्ये एलपीजी गॅसच्या किंमती बदलू शकतात. दर वर्षी ऑइल मार्केटिंग कंपनी या दरांमध्ये बदल करतात. त्याचसोबत UPI 123Pay पेमेंटबाबतचे नियम बदलणार आहेत. याचसोबत ईपीएफओ पेन्शनबाबत नियम बदलणार आहेत.

LPG च्या किंमती (LPG Price Rule)

दर महिन्याला १ तारखेला ऑइल कंपन्या घरगुती आणि एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीवर संशोधन करते आणि नवीन किंमती जाहीर करते. काही दिवसांपूर्वी १९ किलो वजनाच्या एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल करण्यात आले होते. १४ किलो वजनाच्या घरगुती सिलिंडरच्या किंमती स्थिर आहेत.

EPFO चे नियम (EPFO Rule)

नवीन वर्षात कर्मचारी भविष्य निधी योजनेतील नियम बदलणार आहेत. पेन्शनबाबत नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत. यामध्ये आता पेन्शनधारक कोणत्याही बँकेतून पैसे काढू शकतात.

UPI 123 Payचे नियम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑनलाइन पेमेंटबाबत नियम बदलले आहेत. ऑनलाइन पेमेंटसाठी UPI 123 Pay ची सुरुवात केली. यामध्ये ट्रान्झॅक्शन लिमिट वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये युजर्स १०,००० रुपयांपर्यंत ऑनलाइन पेमेंट करु शकतात.

शेअर मार्केटबाबत नियम

सेन्सेक्स आणि सेन्सेक्स ५० मध्ये मंथली एक्सपायरीबाबत बदल करण्यात आले आहे. आता हे शुक्रवारी नाही तर मंगळवारी होणार आबे. तसेच तीन महिने आणि सहा महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट्सची एक्सपायरी मंगळवारी होणार आहे.

शेतकऱ्यांचे लोन

१ जानेवारी २०२५ पासून शेतकऱ्यांना दिले जाणाऱ्या लोनबाबत बदल करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेद्वारे शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत लोन कोणत्याही गॅरंटशिवाय मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

SCROLL FOR NEXT