Rule Change  Saam tv
बिझनेस

Rules Change : १ ऑक्टोबरपासून १० गोष्टींमध्ये बदल; खिशाला कात्री लागण्याआधी वाचा नवे नियम

Rule Change From 1st October : गॅस सिलिंडर ते आधारकार्ड आणि पॅन कार्ड ; ऑक्टोबरपासून होणार 10 मोठे बदल, खिशावर काय परिणाम होणार?

Ruchika Jadhav

१ ऑक्टोबरपासून अनेक वित्तीय नियमांमध्ये बदल होणार आहे. याचा सरळ परिणाम तुमच्या खिशावर होण्याची शक्यता आहे. यामध्ये आधार कार्डपासून अनेक छोट्या मोठ्या योजनांचा सुद्धा समावेश आहे. बदलेले नियम आपल्याला माहिती नसतील तर त्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होतो. त्यामुळे आज आपण नेमक्या कोणत्या गोष्टींतील नियमांत बदल झाला आहे याची माहिती जाणून घेणार आहोत.

LPG सिलिंडरच्या किंमती

ऑईल मार्केटींग कंपन्यांकडून महिन्याच्या पहिल्याच दिवशी सिलिंडरच्या किंमतीत बदल होत असतो. त्यामुळे १ ऑक्टोबरला सकाळी ६ वाजताच नवे दर जाहिर केले जाऊ शकतात. यंदा दिवाळी आधी गॅस सिलिंडरच्या किंमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ATF आणि CNG-PNG किंमतीत बदल

महिन्याच्या पहिल्याच दिवशी प्रत्येक तेल कंपनी ATF आणि CNG-PNG किंमतीत सुद्धा बदल करते. सप्टेंबर महिन्यात हा भाव कमी झाला होता. त्यामुळे आता पुढच्या महिन्यात भाव वाढणार की कमी होणार हे पाहणं महत्वाचं असेल.

आधार कार्ड

१ ऑक्टोबर २०२४ पासून तुम्ही आधार एनरॉलमेंट आयडीचा वापर परमनंट पॅन कार्ड आणि आयआरटी दाखल करू शकत नाही.

बोनस आणि शेअर्सच्या नियमांत बदल

सेबीने बोनस आणि शेअर्सचे ट्रेडिंगसाठी आणखी सोप्पे व्हावे म्हणून नवीन सारणी तयार केली आहे. १ ऑक्टबरपासून ट्रेडिंग T+2 प्रणालीमध्ये होणार आहे. तसेच ट्रेडिंगचा वेळ सुद्धा कमी होणार असल्याने शेअर होल्डर्संना याचा फायदा होईल.

छोट्या योजनांसाठी नवे नियम

वित्त मंत्रालयाने नॅश्नल स्मॉल सेव्हिंग स्किममध्ये तुकीच्या पद्धतीने खाती खोललेल्या व्यक्तींसाठी नवी निर्देश जाहीर केले आहेत. पीपीएफ, सुकन्या समृद्धी सारखी खाती दुरुस्त केली जाणार आहेत.

सिक्योरीटी ट्रांजेक्शन टॅक्स

(STT) सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्समध्ये बदल होणार आहे. १ ऑक्टोबर २०२४ पासून, विक्रीवरील STT 0.0625% बदलून 0.1% पर्यंत वाढणार आहे.

भारतीय रेल्वे

जे प्रवासी रेल्वेने विना तिकीट प्रवास करतात त्यांच्यावर मोठी कारवाई केली जाणार आहे. पुढील महिन्यापासून सणासुदीचा काळ सुरू होत आहे. त्यामुळे या काळात अनेक प्रवासी प्रवास करतात. रेल्वेचे नुकसान टाळण्यासाठी हा नियम १ तारखेपासूनच सरू होऊ शकतो.

विवाद ते विश्वास योजना

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डने अशी घोषणा केली आहे की विवाद ते विश्वास योजना १ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू होणार आहे. यामध्ये आयकर विभागाशी संबंधित विविध समस्या सोडवल्या जाणार आहेत.

HDFC क्रेडिट कार्ड लॉयलटीमध्ये बदल

HDFC क्रेडिट कार्ड लॉयलटीमध्ये १ ऑक्टोबर २०२४ पासून बदल होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT