RIL AGM 2023, nita ambani, mukesh ambani SAAM TV
बिझनेस

Nita Ambani : नीता अंबानींनी दिला 'रिलायन्स इंडस्ट्रीज'चा राजीनामा; ईशा अंबानींवर मोठी जबाबदारी

Nita Ambani Resigned : मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचा राजीनामा दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Reliance Industries Limited : 'रिलायन्स इंडस्ट्रीज'च्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मोठी घोषणा करण्यात आली. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागेवर ईशा अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या संचालक मंडळात ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्या नियुक्तीची शिफारस केली आहे. नीता अंबानी यांचा आता संचालक मंडळात समावेश नसेल. त्या रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षपदी कायम असतील. या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स रिटेलच्या आयपीओसंदर्भातही मोठी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

मागील दहा वर्षांत रिलायन्स इंडस्ट्रीजने १५० अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. कोणत्याही कार्पोरेट समूहाकडून करण्यात आलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे, असे मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगितले.

आर्थिक वर्ष २०२३ मध्ये रिलायन्सने २.६ लाख नवीन नोकऱ्या (Job) दिल्या. रिलायन्समध्ये सध्याच्या घडीला 'ऑनरोल' कर्मचाऱ्यांची संख्या ३.९ लाखांपर्यंत पोहोचली आहे, अशी माहितीही अंबानी यांनी यावेळी दिली.

रिलायन्सचा एकूण महसूल ९,७४,८६४ कोटी रुपये आहे. तर आर्थिक वर्ष २०२३ मध्ये रिलायन्सचा ईबीआयटीडीए १, ५३, ९२० कोटी रुपये होता. तर निव्वळ नफा ७३,६७० कोटी होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'या' ब्लड ग्रुपच्या व्यक्ती असतात सर्वात हुशार, प्रत्येक कामात मिळतं यश

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

SCROLL FOR NEXT