Samsung Galaxy S21 FE Saam Tv
बिझनेस

Samsung चा 50,000 चा स्मार्टफोन 20,000 पेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, काय आहे ऑफर?

Samsung Galaxy S21 FE: सॅमसंगचा पॉवरफुल कॅमेरा असलेला प्रीमियम स्मार्टफोन पहिल्यांदाच ग्राहकांना 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Samsung Galaxy S21 FE:

सॅमसंगचा पॉवरफुल कॅमेरा असलेला प्रीमियम स्मार्टफोन पहिल्यांदाच ग्राहकांना 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. Samsung Galaxy S21 FE फोनवर जबरदस्त ऑफर मिळत आहे.

Amazon आणि Flipkart सोबतच Croma ऑनलाइन स्टोअरवरही हा फोन कमी किमतीत लिस्ट करण्यात आला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन भारतीय बाजारात 50,000 रुपयांच्या प्रारंभिक किमतीत लॉन्च केला होता.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फॅन एडिशन स्मार्टफोन डिझाइनच्या परफॉर्मन्सच्या दृष्टीने प्रीमियम आहे. हा स्मार्टफोन भारतीय बाजारात 49,999 रुपयांच्या प्रारंभिक किमतीत सादर करण्यात आला होता. आता तो 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे. ग्राहकांनी बँकेच्या ऑफरचा लाभ घेतल्यास याची किंमत 15,000 रुपयांच्या जवळपास येऊ शकते.  (Latest Marathi News)

Galaxy S21 FE 5G भारतीय बाजारपेठेत सॅमसंगने 49,999 रुपयांच्या लॉन्च किमतीत लॉन्च केला होता. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह या डिव्हाइसचा बेस व्हेरिएंट आता क्रोमा वेबसाइटवर फक्त 19,434 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. एचडीएफसी बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास 4000 रुपयांची सूटही ग्राहकांना मिळणार आहे.

Samsung Galaxy S21 FE

बँक डिस्काउंटसह या फोनची किंमत फक्त 15,434 रुपये होईल. ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे आणि या स्मार्टफोनचा स्टॉक मर्यादित आहे. अशातच स्टॉक संपण्यापूर्वी फोन ऑर्डर करणे ग्राहकांना फायदेशीर ठरू शकते.

Galaxy S21 FE 5G स्पेसिफिकेशन

स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह 6.4-इंचाचा फुल HD+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे. या फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह Samsung Exynos 2100 प्रोसेसर आहे. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, फोनच्या मागील पॅनेलमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सपोर्टसह 12MP+12MP+8MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 32MP फ्रंट कॅमेरा आहे. यात फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

SCROLL FOR NEXT