jio company offer goggle
बिझनेस

Jio's Diwali Dhamaka offer: यूजर्ससाठी जिओ कंपनीची खास दिवाळी ऑफर ; दोन रिचार्ज प्लानसह आकर्षक व्हाउचर मिळणार

Jio Company Offer: रिलायन्स जिओ कंपनी नेहमीच ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर घेऊन येत असते. यामुळे ग्राहकांना रिजार्ज प्लॅनचा खूप मोठा फायदा मिळत असतो. आता सध्या जिओ कंपनीने ग्राहकांसाठी दिवाळी धमाका ऑफर सुरु केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या दिवाळी सण मोठ्या उत्साहात सुरु झाला आहे. या दिवसांत मॅाल्स किंवा इतर दुकानांमध्ये दिवाळी मुहूर्तावर अनेक सेल सुरु होतात. त्याचबरोबर ग्राहकांना या सेलचा पुरेपुर फायदा देखील मिळतो. ग्राहकांना या सेलद्वारे अनेक डिस्काउंट आणि व्हाउचर देखील मिळतात. दिवाळीत ऑफर, सेल म्हटलं की ग्राहकांची खूप गर्दी पाहायला मिळते. अशाच ग्राहकांसाठी रिलायन्स जिओने दिवाळी धमाका ऑफर सुरु केली आहे.

जिओ कंपनी नेहमीच ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर्स घेऊन येत असते. याबरोबर नागरिक देखील जिओ ऑफर्सचा मोठ्या प्रमाणात फायदा घेताना पाहायला मिळतात. ग्राहकांच्या याच गोष्टीकडे लक्ष देत जिओ कंपनीने त्यांच्या यूजर्सकर्ता दिवाळी ऑफर सुरु केली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना नवनवीन जिओ ऑफर आणि व्हाउचर बद्दल समजणार आहे. जाणून घेऊया रिलायन्स जिओची दिवाळी धमाका ऑफर.

रिलायन्स जिओ कंपनी यूजर्ससाठी नवीन रिचार्ज प्लॅन ऑफर बरोबर गिफ्ट व्हाउचर घेऊन आली आहे. या ऑफरमध्ये यूजर्सना शॅापिंग, फूड डिलव्हरी आणि प्रवास यांच्यावर सूट मिळणार आहे. रिलायन्स जिओ कंपनीची ही दिवाळी ऑफर नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत असणार आहे. रिलायन्स जिओच्या या दिवाळी ऑफरमध्ये जिओ कंपनी ग्राहकांसाठी दोन खास रिचार्ज प्लॅन घेऊन आली आहे. यामुळे ग्राहकांना या ऑफरचा खूप मोठा फायदा होणार आहे. या दोन रिचार्ज प्लॅनसह ग्राहक गिफ्ट व्हाउचरचा देखील फायदा घेऊ शकणार आहेत.

रिचार्ज प्लॅन

रिलायन्स जिओ कंपनीचा यूजर्ससाठी पहिला रिचार्ज प्लॅन ८९९ रुपयांचा असणार आहे. हा प्लॅन यूजर्ससाठी ३ महिन्यांचा असेल, त्याबरोबर ग्राहकांना 2GB डेटा,अमर्यादित व्हॅाईस कॅाल,अमर्यादित एसएमएस आणि अमर्यादित 5G नेटवर्क सेवांचा पुरेपुर लाभ घेता येणार आहे. याबरोबर जिओ कंपनीचा दुसरा रिजार्ज प्लॅन ३,५९९ रुपयांचा असणार आहे. हा प्लॅन ग्राहकांसाठी एक वर्षापर्यंत मर्यादित आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित व्हॅाईस कॅाल, अमर्यादित एसएमएस आणि 5G नेटवर्कचा लाभ घेता येणार आहे. याबरोबर जिओ वापरकर्त्यांना रिलायन्स जिओच्या व्हाउचर पॅकचा देखील लाभ घेता येणार आहे.

या दिवाळी ऑफरमध्ये ग्राहकांच्या कोणत्याही रिचार्ज प्लॅनमध्ये ३,३५० रुपयांपर्यंतचे विशेष व्हाउचर उपलब्ध असणार आहे. या ३,३५० व्हाउचरमध्ये ग्राहकांना प्रवास बुकिंगचे ३,००० रुपयांपर्यंतचे माय ट्रिप व्हाउचर मिळेल. याबरोबर ग्राहकांसाठी शॅापिंग व्हाउचर आणि फूड व्हाउचर देखील उपलब्ध आहे. फूड व्हाउचरवर ग्राहकांना १५० रुपयांची सूट मिळणार आहे. रिलायन्स जिओची ही दिवाळी ऑफर ग्राहकांसाठी फक्त ५ नोव्हेंबर पर्यंत सुरु असणार आहे. रिलायन्स जिओ ऑफरचा लाभ यूजर्स MyJio अॅपवर जाऊन घेऊ शकता. यानंतर ग्राहकांना रिचार्ज केल्यानंतर 'माय विनिंग्समध्ये' त्यांचे व्हाउचर पाहायला मिळेल.

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT