OnePlus नंतर आता Redmiही आणणार 108MP कॅमेरावाला फोन, जाणून घ्या इतर फीचर्स
Redmi 13 5G launch Date Price and Features  gadget 360
बिझनेस

OnePlus नंतर आता Redmiही आणणार 108MP कॅमेरावाला फोन; जाणून घ्या इतर फीचर्स

Bharat Jadhav

नुकतेच OnePlus कंपनीने Nord CE 4 Lite 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने या फोनची किमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी ठेवली होती. आता वनप्लसनंतर Xiaomi कंपनीचा सब-ब्रँड Redmi पुढील महिन्यात भारतात Redmi 13 5G लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या फोनची किमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी असेल असं म्हटलं जात आहे. हा स्मार्टफोन बाजारात कधी येणार आणि त्याचे काय फीचर्स असतील याची माहिती चीनी स्मार्टफोन कंपनीने दिलीय.

अनेकांच्या बजेटमधील 5G स्मार्टफोन 9 जुलै रोजी भारतात लॉन्च होणार आहे. Xiaomi च्या अधिकृत शॉप्सशिवाय Amazon India वर देखील हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. फोनमध्ये सेल्फी कॅमेरासाठी पंच होल डिस्प्ले आहे. तर या सेगमेंटमधील सर्वात मोठा डिस्प्ले असल्याचे सांगितलं जातं आहे. फोनमध्ये फ्लॅट फ्रेम आणि बॅक असेल. स्मार्टफोनचा आवाज कमी जास्त करण्याचं बटण आणि स्विच ऑफ करण्याचं बटण हे फोनच्या उजव्या बाजुला देण्यात आलंय. तर यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि स्पीकर युनिट फोनच्या तळाशी दिसेल. तर वरच्या बाजूला हेडफोन जॅक आणि IR ब्लास्टर असेल.

Redmi 13 5G मध्ये स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 एक्सेलेरेटेड एडिशन चिपसेट मिळेल. हो हॅण्डसेट Xiaomi HyperOS वर चालेल. हा फोन 33W चार्जिंग होतो तर 5,030mAh बॅटरी या फोनला देण्यात आलीय. या डिव्हाइसमध्ये मागील बाजूस रिंग एलईडी फ्लॅशसह 108MP प्राथमिक कॅमेरा देण्यात येणार आहे. तर हा फोन गुलाबी आणि निळ्या रंगात लॉन्च होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Team India: बार्बाडोसच्या मैदानात भारताने रचला इतिहास, 2007 नंतर कोरलं टी20 विश्वचषकावर नाव

Sambhaji Bhide Video: नट्यांनी, ड्रेस घातलेल्या महिलांनी वटसावित्रीच्या पूजेला जाऊ नये; संभाजी भिडे यांचं वादग्रस्त विधान

Samsung ते Oppo, जुलैच्या पहिल्याच आठवड्यात भारतात लॉन्च होणार हे जबरदस्त स्मार्टफोन

Budh Gochar: एक जुलैपासून बुध करणार पुष्य नक्षत्रात प्रवेश; ५ राशींचं चमकणार नशीब

12GB RAM आणि 512GB स्टोरेज, Honor 200 Pro स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लॉन्च

SCROLL FOR NEXT