Recharge Plan Under Rs 400 
बिझनेस

Recharge Plan: फक्त 349 रुपयांमध्ये मिळेल 56GB डेटा,अमर्यादित कॉलिंगसह घेता येईल OTT चा आनंद

Bharat Jadhav

Reliance Jio, Airtel, Vodafone Idea आणि BSNL द्वारे विविध रिचार्ज प्लॅन ऑफर केल्या जात आहेत. चारही कंपन्या त्यांच्या ग्राहकांना वेगवेगळ्या किंमती आणि सुविधांसह रिचार्ज प्लॅन देत आहेत. तुम्ही 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा प्लान शोधत असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी एक परवडणारा रिचार्ज प्लॅन घेऊन आलोय. यात तुम्ही OTT सह अमर्यादित कॉलिंग आणि एसएमएसचा आनंद घेऊ शकाल.

349 रुपयांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन

तुम्ही 400 रुपयांपेक्षा कमी रिचार्ज प्लॅन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 349 रुपयांचा प्लॅन विकत घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला जिओ यूजर असणे आवश्यक आहे. जिओ कंपनीकडून 349 रुपयांचा रिचार्ज प्लॅन ऑफर देण्यात येत आहे. यात डेटा, कॉलिंग, एसएमएस आणि ओटीटीचे फायदे दिले जातात.

Reliance Jio Rs 349 Recharge Plan

जिओच्या हिरो प्लॅनपैकी एक 349 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आहे. याची वैधता 28 दिवस आहे. प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा येतो, जो 28 दिवसांसाठी एकूण 56GB डेटाचा लाभ मिळतो. इतर प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, 100 एसएमएस आणि OTT चे फायदे मिळतात.

अमर्यादित डेटा आणि OTT चा आनंद कुठे मिळेल

जर तुम्ही अशा भागात आलात असाल 5G नेटवर्क सुविधा उपलब्ध असेल तर तुम्हाला या प्लॅनसह अमर्यादित डेटाचा लाभ देखील मिळेल. जिओ या 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित 5जी डेटाचा लाभ मिळेल. यासोबत Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

BSNL रु. 347 रिचार्ज प्लॅन

बीएसएनएलचा 347 रुपयांचा प्लॅन 400 रुपयांपेक्षा कमी आहे. त्याची वैधता 54 दिवसांपर्यंत आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचा लाभ मिळत असतो. हा प्लॅन 4G नेटवर्कच्या सुविधेसह येत असतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sri Lanka Tourism : श्रीलंकेत मनसोक्त आणि कमी खर्चात फिरता येणार; कसं वाचा संपूर्ण डिटेल्स

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT