REALME LAUNCHES 15000MAH BATTERY SMARTPHONE WITH 4-DAY BATTERY LIFE 
बिझनेस

Realme Smartphone: चार्जिंगची चिंता संपणार! एकदा चार्ज करुन ४ दिवस चालणारा नवीन स्मार्टफोन लवकरच येणार बाजारात

Realme New Phone: Realme आपल्या ७व्या वर्धापन दिनानिमित्त खास घोषणा करणार आहे. कंपनी १५,०००mAh बॅटरीसह नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे, जो दीर्घकाळ चार्ज होणार नाही, सर्व चार्जिंग समस्या सोडवेल.

Dhanshri Shintre

  • रियलमी १५,०००mAh बॅटरीसह नवीन स्मार्टफोन लवकरच लाँच करणार आहे.

  • फोन एका चार्जवर ४ दिवस चालेल आणि १८ तास व्हिडिओ रेकॉर्डिंग व ३० तास गेमिंग देईल.

  • TEC कूलिंग तंत्रज्ञानामुळे डिव्हाइसचे कोर तापमान 6°C पर्यंत कमी होते.

  • फ्लाइट मोडमध्ये फोन स्टँडबायवर तीन महिने टिकेल आणि गेमिंगसाठी उत्तम कार्यक्षमता देईल.

Realme आपल्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त लवकरच एक अनोखा स्मार्टफोन सादर करणार आहे, जो बॅटरी आणि गरमीच्या समस्यांवर पूर्णत: तोडगा ठरू शकतो. कंपनीने नुकतीच घोषणा केली आहे की २७ ऑगस्ट २०२५ रोजी ही नवीन डिव्हाइस सादर केली जाईल, ज्यामध्ये १५,०००mAh बॅटरीसह ‘चिल फॅन’ तंत्रज्ञान दिले गेले आहे. हा फोन एका चार्जवर अनेक दिवस चालेल, ज्यामुळे चार्जिंगचा ताण कमी होईल आणि यूजर्सना सतत चार्जिंगची चिंता करण्याची गरज राहणार नाही.

कंपनीच्या मते, फोन पूर्णपणे चार्ज केल्यानंतर तो साधारण चार दिवस चालेल. यामध्ये १८ तास व्हिडिओ रेकॉर्डिंग, ५३ तास व्हिडिओ प्लेबॅक आणि ३० तास गेमिंग करता येईल. त्याचबरोबर, फ्लाइट मोडमध्ये फोन स्टँडबायवर तीन महिने टिकेल. यासाठी १००% सिलिकॉन एनोड तंत्रज्ञान वापरले गेले आहे, जे बॅटरीची कार्यक्षमता आणि दीर्घायुष्यासाठी महत्त्वाचे आहे.

बॅटरीसोबतच, या फोनमध्ये थर्मोइलेक्ट्रिक कूलिंग (TEC) तंत्रज्ञानासह एक लहान अंतर्गत पंखा देखील देण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान सहसा बाह्य कूलिंग अॅक्सेसरीजमध्ये वापरले जाते, परंतु Realme ने ते थेट स्मार्टफोनमध्ये समाविष्ट करून डिव्हाइसचे कोर तापमान 6°C पर्यंत कमी करण्याचा दावा केला आहे. या तंत्रज्ञानामुळे उच्च ग्राफिक्ससह गेमिंग करताना फोनचे कार्यप्रदर्शन अधिक स्थिर आणि परिणामकारक राहील.

Realme Chill Fan फोनची रचना आणि तंत्रज्ञान विशेषतः गेमिंग आणि मल्टिमीडिया यूजर्ससाठी बनवण्यात आलेली आहे, ज्यामुळे जास्त वेळ फोन वापरताना बॅटरी आणि उष्णतेची समस्या नसेल. कंपनीचा असा दावा आहे की हा फोन स्मार्टफोन बाजारात खळबळ माजवणारा ठरणार आहे आणि यूजर्ससाठी चार्जिंगच्या ताणाला कायमचा विराम देईल.

रियलमीचा नवीन स्मार्टफोन कधी लाँच होणार आहे?

हा फोन २७ ऑगस्ट २०२५ रोजी लाँच होणार आहे.

या फोनमध्ये बॅटरी क्षमता किती आहे?

यात १५,०००mAh बॅटरी आहे.

फोन एका चार्जवर किती दिवस चालेल?

कंपनीच्या मते फोन एका चार्जवर साधारण ४ दिवस चालेल.

फोनमध्ये कोलिंगसाठी कोणते तंत्रज्ञान वापरले आहे?

थर्मोइलेक्ट्रिक कूलिंग (TEC) तंत्रज्ञानासह अंतर्गत लहान पंखा दिला आहे, ज्यामुळे फोनचे कोर तापमान 6°C पर्यंत कमी होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Ornaments: कोणत्या लोकांनी सोनं घालू नये? कारण एकदा वाचाच

Manoj Jarange Patil Protest Live Updates : आझाद मैदानात एका तरुणाचा फाशी घेण्याचा प्रयत्न

Manoj Jarange: मनोज जरांगेंना ओबीसीमधूनच आरक्षण का हवय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजने’वरून जरांगे पाटलांचा फडणवीसांवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षण मिळवण्यासाठी पूर्ण पाठिंबा - छत्रपती संभाजीराजे

SCROLL FOR NEXT