रियलमीने P4 सिरीज अंतर्गत दोन स्मार्टफोन्स – P4 प्रो आणि P4 लाँच केले.
या सिरीजमध्ये ड्युअल-चिप प्रोसेसर, 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 7000mAh टायटन बॅटरी देण्यात आली आहे.
रियलमी P4 प्रोमध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 4 आणि P4 मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7400 5G प्रोसेसर आहे.
किंमत ₹14,999 पासून सुरू होऊन ₹23,999 पर्यंत जाते; विक्री Flipkart आणि realme.com वर उपलब्ध.
भारतीय तरुणांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या स्मार्टफोन ब्रँड रियलमीने त्याची अतिशय प्रतीक्षित अशी रियलमी P4 सिरीज लॉंच केली आहे. या सिरीजच्या अंतर्गत रियलमी P4 प्रो आणि रियलमी P4 हे दोन मॉडेल्स लाँच करण्यात आले आहेत. फ्लॅगशिप दर्जाच्या तंत्रज्ञानासह तयार करण्यात आलेली ही सिरीज एक अष्टपैलू पर्याय म्हणून सादर करण्यात आली असून, ड्युअल-चिपद्वारे संचालित दमदार कार्यक्षमता, प्रो-ग्रेड कॅमेरे, सिनेमा-गुणवत्तेचे डिस्प्ले आणि दिवसभर टिकणारी बॅटरी ही वैशिष्ट्ये लाखो तरुण वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
हायपर व्हीजन एआय चिप, स्नॅपड्रॅगन 7 जनरेशन 4 प्रोसेसर, ड्युअल 50MP AI कॅमेरे, 144Hz हायपरग्लो AMOLED डिस्प्ले आणि 7000mAhची टायटन बॅटरी यांसारख्या अद्वितीय तांत्रिक वैशिष्ट्यांसह रियलमी P4 सिरीजने या किंमत श्रेणीत ग्राहकांच्या अपेक्षांन्या नव्याने परिभाषित केले आहे. रियलमी P4 प्रो हा ₹20,000 आणि रियलमी P4 हा ₹15,000च्या आत मिळणारे सर्वोत्कृष्ट ड्युअल-चिप स्मार्टफोन ठरतात.
या प्रसंगी रियलमी इंडियाचे मुख्य मार्केटिंग ऑफिसर फ्रान्सिस वोंग म्हणाले, “रियलमी P4 सिरीजमुळे आम्ही पुन्हा एकदा ई-कॉमर्स क्षेत्रात दमदार पुनरागमन करत आहोत. फ्लॅगशिपची व्याख्या आता बदलली आहे – केवळ चांगले तंत्रज्ञान कोणाकडे आहे यापेक्षा त्याचा दृष्टीकोन सगळ्यांसाठी कोण उपलब्ध करून देतो हेही महत्त्वाचे आहे. रियलमीने ड्युअल-चिप आर्किटेक्चरच्या मोठ्या प्रमाणावर वापराची सुरुवात केली आहे, जे पूर्वी केवळ फ्लॅगशिप डिव्हाइसेसपुरते मर्यादित होते. खास भारतासाठी डिझाइन केलेले P4 प्रो आणि P4 हे केवळ इतरांशी स्पर्धा करत नाहीत, तर त्यांना मागे टाकतात आणि ₹20,000पेक्षा कमी किंमत असलेले सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन ठरतात.”
फ्लॅगशिप स्तराची कामगिरी देणारे अॅडव्हान्स ड्युअल-चिप आर्किटेक्चर
प्रथमच ₹30,000च्या आत रियलमी P4 सिरीज ड्युअल-चिप आर्किटेक्चरसह उपलब्ध होत आहे, जे फ्लॅगशिप स्तराची कामगिरी आणि व्हिज्युअल्स अधिक व्यापक यूजर्सपर्यंत पोहोचवते. रियलमी P4 प्रोमध्ये स्नॅपड्रॅगन 7 जनरेशन 4 प्रोसेसर आणि पिक्सेलवर्क्सस विकसित हायपर व्हीजन एआय चिपसेट यांचा समावेश आहे. हे आर्किटेक्चर मल्टीटास्किंग, हाय-एंड गेमिंग आणि एआय आधारित अॅप्ससाठी उत्तम कार्यक्षमता ऑफर करते. स्नॅपड्रॅगन 7 जनरेशन 4 हे सीपीयू आणि जीपीयूसंबंधित जड ऑपरेशन्स हाताळते, तर हायपर व्हीजन एआय चिप हे रिअल-टाईम फ्रेम जनरेशन, एआय रेझोल्यूशन अपस्केलिंग आणि व्हिज्युअल एन्हान्समेंटची जबाबदारी सांभाळतात. त्यामुळे रियलमी P4 प्रो विस्तारीत गेमिंग सेसन्सच्या दरम्यानही गरम न होता उच्च कार्यक्षमतेने काम करतो.
रियलमी P4मध्येही वरील सारखेच ड्युअल-चिप सेटअप असून, यात मीडियाटेक डायमेंसिटी 7400 5G प्रोसेसरसह एक स्वतंत्र पिक्सेलवर्क्स जीपीयू वापरले गेले आहे. हे कॉम्बिनेशन स्मूदर फ्रेम रेट्स, अधिक अचूक रंग आणि एआयद्वारे क्लॅरिटी सुधारण्यास मदत करते. पिक्सेलवर्क्स हे प्रोसेसरवर रेंडरिंगचे काम सोपवून मुख्य SoCला अधिक स्थिर परफॉर्मन्स प्रदान करू शकतो, ज्यामुळे बॅटरीचे आयुष्य आणि तापमानावर नियंत्रण राखून बीजीएमआयसारखे ग्राफिक्स-हेवी गेम्स देखील सहज चालतात.
हायपरग्लो AMOLED डिस्प्लेसह व्हिज्युअल प्रगती
रियलमी P4 प्रोमध्ये 144Hz हायपरग्लो AMOLED 4D Curve+ डिस्प्ले उपलब्ध आहे, जो त्याच्या सेगमेंटमध्ये सर्वात जास्त म्हणजे 6500nitsचे पीक ब्राईटनसह येतो. HDR10+ सर्टिफिकेशन, 1.07 अब्ज रंग, आणि 100% DCI-P3 कलर गॅमट यामुळे हा डिस्प्ले प्रोफेशनल मॉनिटर्ससारखा अनुभव प्रदान करतो. 120Hz डिस्प्लेशी तुलना करता 144Hzचा रिफ्रेश रेट हा 20% अधिक स्मूथ आहे, ज्यामुळे गेमिंग आणि स्क्रोलिंगचा अनुभव अतुलनीय ठरतो. TÜV रिनलँड सर्टिफिकेशन, हार्डवेअर लेव्हल लो-ब्लू-लाईट प्रोटेक्शन, आणि 4320Hz डिमिंग यामुळे डोळ्यांवर ताण न येता स्पष्टता प्राप्त होते.
रियलमी P4मध्ये 6.77-inch FHD+ हायपरग्लो AMOLED डिस्प्ले उपलब्ध असून, तोसुद्धा 144Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ला सपोर्ट करतो. 4500nitsपर्यंतचे ब्राईटनेस ऑफर करत ते थेट सूर्यप्रकाशातही आकर्षक व्हिज्यूअल इफेक्ट्स डिलिव्हर करते. तसेच, 1.07 अब्ज रंग आणि 3840Hz PWM डिमिंग यांमुळे सिनेमॅटिक अनुभव देत वापरकर्त्याच्या डोळ्यांचे संरक्षणही करते.
टायटन बॅटरीसह अभूतपूर्व पॉवर
रियलमी P4 प्रो हा 7000mAh बॅटरीसह येणारा त्याच्या सेगमेंटमधील सर्वात स्लिम आणि हलका डिव्हाइस आहे, ज्याची जाडी फक्त 7.68mm आहे. त्याची ही बॅटरी 90FPSवर बीजीएमआयसाठी तब्बल 8+ तासांचा गेमिंग अनुभव ऑफर करते. रियलमी P4मध्येही हीच 7000mAh टायटन बॅटरी उपलब्ध आहे, जी 11 तासांपर्यंत सतत गेमिंग चालू ठेवते. 80W अल्ट्रा चार्जमुळे ती फक्त 25 मिनिटांत 50%पर्यन्त चार्ज होते.
7000mm² एयरफ्लो VC कूलिंगसह थर्मल मॅनेजमेंट
या दोन्ही फोन्समध्ये त्यांच्या सेगमेंटमधील सर्वात मोठी अशी 7000mm² एयरफ्लो VC कूलिंग सिस्टम दिलेली आहे. व्हेपर चेंबरची ही रचना सीपीयू तापमानला 20°Cपर्यंत कमी ठेवते, त्यामुळे 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा गेमिंग दरम्यानही कार्यक्षमता टिकून राहते. रियलमीने यांमध्ये अल्ट्रा-कंडक्टिव ग्राफाइट आणि मोठे थर्मल लेअर्स वापरून सतत स्मूथ परफॉर्मन्स सुनिश्चित केला आहे.
फ्लॅगशिप डीएनएसह दैनंदिन फोटोग्राफी
रियलमी P4 प्रोमध्ये दोन्ही बाजूंना 50MP AI कॅमेरे दिले आहेत. मागील कॅमेरा हा OIS असलेल्या सोनी IMX896 सेन्सरसह येत आणि तो प्रोफेशनल पोर्ट्रेट्स, नाईटस्केप्स आणि लो-लाइट फोटोंसाठी आदर्श आहे. दुसरीकडे, सेल्फीसाठी दिलेला 50MP OV50D फ्रंट कॅमेरासुद्धा अतिशय सुस्पष्ट फोटोज आणि व्ह्लॉगिंगसाठी योग्य आहे. हे दोन्ही कॅमेरे 4K 60FPS व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात आणि त्यामुळे क्रिएटर्सनया कोणत्याही अॅंगलने सिनेमॅटीक क्वालिटीचे फूटेज घेण्यास सक्षम करतात.
रियलमी P4मध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स उपलब्ध करून दिली आहे. समोरच्या बाजूला 16MP सोनी IMX480 कॅमेरा आहे, जो स्पष्ट सेल्फी आणि उच्च-गुणवत्तेच्या व्हिडिओ कॉल्ससाठी योग्य आहे. 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्टमुळे रियलमी P4 हा डिव्हाइस व्ह्लॉगर्स, विद्यार्थ्यांसाठी आणि प्रोफेशनल्ससाठी एक उत्तम पर्याय ठरतो.
बेस्ट-इन-क्लास AI फीचर्स
रियलमी P4 प्रो आणि रियलमी P4 या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये एआय-सक्षम मोड्स उपलब्ध आहेत, जे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीच्या अनुभवाला उंचावतात. रियलमी P4 सिरिजमधील एआय एडिट जिनी नावाचे टूल फोटो एडिटिंगला सुलभ करते, ज्यात वापरकर्ता फक्त व्हॉईस कमांडद्वारे ऑब्जेक्टस जोडू शकतो, पार्श्वभूमी बदलू शकतो, सौंदर्यवर्धन करू शकतो किंवा नको असलेले घटक काढून टाकू शकतो. ऑन-डिव्हाईस एआय इन्सपिरेशन हे फिचर प्रत्येक फोटोचे ऑटोमॅटीक विश्लेषण करून आपोआप व्यावसायिक दर्जाचे एडिटिंग प्रदान ऑफर करते. हे फीचर ब्राइटनेसला योग्य करते, ग्रेनिंग कमी करते, एक्स्पोजर ऑप्टिमाइझ करते, त्वचेचा नैसर्गिक रंग अधिक खुलवते आणि झगमगाट काढून टाकते.
AI ट्रॅव्हल स्नॅप, AI लॅंडस्केप, आणि AI स्नॅप मोड यांसारखी फीचर्स फ्रेमिंग, रंग आणि एक्सपोजर यांचे इंटेलिजंटली ऑप्टिमायझेशन करतात, तर अल्ट्रा स्टेडी मोड आणि AI मोशन स्टेबलायझेशन हे हलत्या स्थितीत किंवा कमी प्रकाशातही व्हिडिओ स्मूथपणे रेकॉर्ड होईल याची खात्री करतात. याशिवाय, अंगभूत AI डॉक्युमेंट स्कॅनरसारखे उपयुक्त टूल्स आपोआप पेजेस क्रॉप आणि एन्हान्स करतात, जेणेकरून क्लीन आणि सहज शेअर करता येणारे परिणाम मिळतात. यामुळे रियलमी P4 सिरीजमधील कॅमेरे हे फक्त फोटोग्राफीसाठीच नव्हे, तर सर्जनशील काम, ऑफिस वर्क आणि दैनंदिन वापरासाठीही बहुपर्यायी साधने ठरतात. हे सर्व AI टूल्स एकत्रितपणे वापरकर्त्याला सर्व मिड-प्रिमियम श्रेणीत सहजतेने प्रो-लेव्हल एडिटिंग क्षमतांसह सुंदर आणि शेअर करता येण्याजोगे फोटो तयार करण्याची मुभा देतात.
डिझाईन
रियलमी P4 प्रोमध्ये लिव्हिंग नेचर डिझाईनचा पहिल्यांदाच स्वीकार करण्यात आला आहे. ही डिझाईन नैसर्गिक प्रेरणा आणि आधुनिक कारागिरी यांचा सुंदर संगम आहे, ज्यामुळे ही डिव्हाइस केवळ दिसायला आकर्षकच नाही, तर वापरतानाही विशिष्ट अनुभव प्रदान करते. याचा मागील पॅनल प्रिमियम टेक-वूड मटेरिअलपासून तयार करण्यात आला आहे, जो त्याच्या टिकाऊपणा आणि प्रीमियम फिनिशसाठी निवडण्यात आला आहे. या पॅनलवरील प्रत्येक ग्रेन पॅटर्न अत्यंत बारकाईने पॉलिश करण्यात आलेला आहे, ज्यामुळे नैसर्गिक टेक्सचर आणि डेप्थ जशीच्या तशी जपली जाते. परिणामी, हे सरफेस स्पर्शाने स्मूद वाटते, प्रकाशानुसार बदलणारे व्हिज्युअल डिटेल्स देते आणि दररोजच्या वापरात टिकून राहते.
रियलमी P4 प्रो हा तीन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असेल: 8GB + 128GB – प्रभावी किंमत ₹19,999, 8GB + 256GB – प्रभावी किंमत ₹21,999 आणि 12GB + 256GB – प्रभावी किंमत ₹23,999. ग्राहकांसाठी सर्वात मोठी लॉन्च ऑफर फक्त 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते मध्यरात्रीपर्यंत उपलब्ध असेल. पहिली विक्री याच दिवशी दुपारी 12 वाजता सुरू होईल.
रियलमी P4 देखील तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असेल: 6GB + 128GB – प्रभावी किंमत ₹14,999, 8GB + 128GB – प्रभावी किंमत ₹15,999 आणि 8GB + 256GB – प्रभावी किंमत ₹17,999. 20 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत खास अर्ली बर्ड सेल आयोजित करण्यात आले आहे. तर, 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेपासून पहिली अधिकृत विक्री सुरू होईल. हे दोन्ही स्मार्टफोन्स Flipkart, realme.com आणि देशभरातील मुख्य रिटेल स्टोअर्सवर खरेदीसाठी उपलब्ध असतील.
टीप: काही किंमती ऑफरवर अवलंबून असू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.