Battery Saving Tips : फोनची बॅटरी लगेच संपतेय? 'या' ५ सेटिंग लगेच बदला, मोबाईल चालेल अधिक काळ

Smartphone Tips: जर तुमच्या मोबाईलची बॅटरी लवकर संपत असेल, तर काही सोप्या टेक टिप्स अवलंबून तुम्ही बॅटरीचे आयुष्य वाढवू शकता. जाणून घ्या या उपयोगी टिप्स.
SMARTPHONE BATTERY SAVING TIPS EXTEND YOUR PHONE LIFE WITH SIMPLE SETTINGS
SMARTPHONE BATTERY SAVING TIPS EXTEND YOUR PHONE LIFE WITH SIMPLE SETTINGS
Published On
Summary
  • ऑलवेज ऑन डिस्प्ले बंद केल्याने बॅटरीचा अनावश्यक वापर कमी होतो.

  • डार्क मोड वापरल्याने स्क्रीन कमी उर्जा खर्च करते.

  • स्क्रीन ब्राइटनेस आणि स्लीप टाइम कमी ठेवल्यास बॅटरी टिकते.

  • अडॉप्टिव्ह बॅटरी आणि सेव्हर मोड बॅटरी आयुष्य वाढवण्यासाठी उपयुक्त.

स्मार्टफोन युजर्ससाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे बॅटरी लवकर डिस्चार्ज होणे. पूर्वी कीपॅड फोन एका चार्जवर दोन-तीन दिवस सहज चालायचे. पण आजचे अँड्रॉइड फोन एक दिवसही टिकत नाहीत. सतत चार्जिंगची गरज भासल्याने यूजर्स त्रस्त होतात. मात्र, काही सोप्या टिप्स आणि सेटिंग्ज बदल करून तुम्ही तुमच्या मोबाईलची बॅटरी जास्त काळ टिकवू शकता. या उपायांचा अवलंब केल्यास बॅटरीचा वापर कमी होईल आणि चार्जिंगवर अवलंबित्व घटेल. चला जाणून घेऊया स्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवण्याच्या खास टिप्स कोणत्या आहेत.

ऑलवेज ऑन डिस्प्ले

फोन लॉक असताना स्क्रीनवर वेळ किंवा नोटिफिकेशन्स दिसत असल्यास ‘ऑलवेज ऑन डिस्प्ले’ फीचर सुरू असते. हे आकर्षक असले तरी बॅटरी लवकर संपवते. कंपन्यांच्या माहितीनुसार, दर तासाला साधारण १-२% बॅटरी वापरले जाते, मात्र प्रत्यक्षात जास्तही होऊ शकते. त्यामुळे बॅटरी वाचवण्यासाठी हे फीचर बंद करणे महत्त्वाचे आहे. यासाठी सेटिंग्जमध्ये ‘लॉक स्क्रीन’ किंवा ‘डिस्प्ले’ विभागात जाऊन ‘ऑलवेज-ऑन डिस्प्ले’ ऑप्शन बंद करा.

SMARTPHONE BATTERY SAVING TIPS EXTEND YOUR PHONE LIFE WITH SIMPLE SETTINGS
Vi Recharge: Vi देखील देईल धक्का! Jio आणि Airtelनंतर Vi प्लॅन्सवर देखील परिणाम, लवकरच स्वस्त रिचार्ज बंद होण्याची शक्यता

स्क्रीन ब्राइटनेस आणि स्लीप टाइम

बॅटरी जास्त काळ टिकवण्यासाठी स्क्रीनची ब्राइटनेस कमी ठेवणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. यासोबतच फोनचा ‘स्लीप टाइम’ कमी करणेही महत्त्वाचे आहे. अनेकजण तो एक मिनिट किंवा त्याहून अधिक ठेवतात, ज्यामुळे फोन वापरात नसतानाही स्क्रीन बराच वेळ चालू राहते आणि बॅटरी अनावश्यक खर्च होते.

SMARTPHONE BATTERY SAVING TIPS EXTEND YOUR PHONE LIFE WITH SIMPLE SETTINGS
Real Money Gaming: ऑनलाइन गेमिंगवर मोठा बदल! सरकार Real Money Gamesवर बंदी आणण्याच्या तयारीत, नेमका प्रकार काय? वाचा सविस्तर

बॅटरी सेव्हर मोड

स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असलेले ‘बॅटरी सेव्हर मोड’ फीचर बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हा मोड सुरू ठेवल्यास बॅकग्राउंडमध्ये चालणाऱ्या अॅप्सची क्रिया कमी होते आणि अनावश्यक व्हिज्युअल इफेक्ट्स थांबवले जातात. काही मॉडेल्समध्ये ‘एक्सट्रीम बॅटरी सेव्हर’ हा अतिरिक्त पर्यायही मिळतो, ज्यामुळे बॅटरी आणखी जास्त काळ टिकते.

SMARTPHONE BATTERY SAVING TIPS EXTEND YOUR PHONE LIFE WITH SIMPLE SETTINGS
Google Pixel 10 Pro Fold 5G भारतात लाँच, काय आहेत दमदार फिचर्स आणि किंमत? वाचा सविस्तर

डार्क मोड

फोनची बॅटरी जास्त काळ टिकवण्यासाठी डार्क मोड वापरणे फायदेशीर ठरते. हा मोड सुरू ठेवल्यास स्क्रीनवरील पिक्सेल कमी प्रकाश वापरतात आणि त्यामुळे बॅटरीचा खर्च कमी होतो. डार्क मोड सुरू करण्यासाठी सेटिंग्जमधील ‘डिस्प्ले’ पर्याय उघडा आणि दिलेल्या लाईट व डार्क थीमपैकी डार्क मोड निवडा.

अ‍ॅडॉप्टिव्ह बॅटरी

अँड्रॉइड फोनमध्ये उपलब्ध असलेले ‘अ‍ॅडॉप्टिव्ह बॅटरी’ फीचर बॅटरीचा वापर कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. हलकी कामे जसे की ईमेल तपासताना हे फीचर फोनचा स्पीड कमी करून उर्जा वाचवते. हे सक्रिय करण्यासाठी सेटिंग्जमधील ‘बॅटरी’ विभागात जा, ‘अ‍ॅडॉप्टिव्ह प्रेफरन्सेस’ उघडा आणि ‘अ‍ॅडॉप्टिव्ह बॅटरी’ पर्याय चालू करा.

Q

स्मार्टफोनची बॅटरी लवकर का संपते?

A

स्क्रीन ब्राइटनेस जास्त असणे, ऑलवेज ऑन डिस्प्ले सुरू असणे, बॅकग्राउंड अॅप्स आणि इंटरनेटचा जास्त वापर हे मुख्य कारणे आहेत.

Q

बॅटरी वाचवण्यासाठी सर्वात सोपा उपाय कोणता?

A

स्क्रीनची ब्राइटनेस कमी ठेवणे आणि ‘डार्क मोड’ वापरणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे.

Q

अडॉप्टिव्ह बॅटरी म्हणजे काय?

A

हे अँड्रॉइड फीचर फोनच्या वापरानुसार उर्जा वाचवते आणि अनावश्यक प्रोसेसेस थांबवते.

Q

बॅटरी सेव्हर मोड कसा मदत करतो?

A

हा मोड सुरू ठेवल्यास बॅकग्राउंड अॅप्सची क्रिया थांबते, व्हिज्युअल इफेक्ट्स कमी होतात आणि बॅटरी जास्त काळ टिकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com