RBI Saam Tv
बिझनेस

RBI Rules: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! चेक क्लिअरन्सच्या नियमांत केला बदल

RBI Decision for Cheque Clearence: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता काही तासातच चेक क्लिअरन्स होणार आहे. चेक क्लिअरन्ससाठी आधी एक-दोन दिवस वाट पाहावी लागायची.

Siddhi Hande

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहेत. आता चेक क्लिअरन्स सिस्टीममध्ये मोठा बदल केला आहे. रिपोर्टनुसार, आता चेक क्लिअरन्स काही दिवसांमध्ये नव्हे तर काही तासांत होणार आहे. यामुळे ग्राहकांना मात्र दिलासा मिळणार आहे. त्यांना आता चेक क्लिअरन्ससाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही.

याआधी चेक क्लिअरन्ससाठी दोन-तीन दिवस लागायचे. परंतु आता या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. तुम्हाला काही तासातच चेक क्लिअर होणार आहे. म्हणजे अवघ्या काही तासातच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत. याआधी तुम्हाला दोन-तीन दिवस वाट पाहावी लागायची. या बदलामुळे चेक NEFT आणि RTGS सारख्या इन्स्टंट पेमेंटसारखं काम करेल. यामुळे पैशाचे व्यव्हार अधिक सोपे आणि जलद होणार आहे.

आरबीआयचा नवीन नियम

आरबीआयच्या नवीन नियमानुसार, चेक स्कॅन केले जातील. त्यानंतर काही तासातच सादर केले जातील. त्यानंतर ते पास केले जातील. हे कामकाजांच्या दिवसात होणार आहे. चेक क्लिअरन्सचे काम अवघ्या काही तासांवर आले आहेत. आरबीआयच्या नवीन नियमानुसार, चेक क्लिअरन्स दोन टप्प्यात केले जाईल. याचा पहिला टप्पा ४ ऑक्टोबर २०२५ तर दुसरा टप्पा ३ जानेवारी २०२६ पासून सुरु होणार आहे.

या नवीन नियमांनुसार, बँकांना १० ते ४ या कालावधीत मिळालेले चेक त्वरित क्लिअरिंग हाउसमध्ये पाठवले जातील. आता बँकांना दिलेल्या वेळेतच चेक क्लिअरन्स करावा लागेल. जर बँकेने निर्धारित वेळेत याची माहिती दिली नाही तर तो चेक बरोबर असल्याचे मानले जाईल आणि डायरेक्ट पैशाचे व्यव्हार केले जातील.

पैशांची प्रक्रिया पूर्ण होताच क्लिअरिंग हाऊस ही माहिती लगेच बँकेला देणार आहे. त्यानंतर बँक एक तासाच्या आत ग्राहकाच्या खात्यात पैसे जमा केले जातील. आरबीआयने सर्व बँकांना ही माहिती ग्राहकांना देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटी! किश्तवाडमध्ये पूरस्थिती; ३० जणांचा मृत्यू, १२० जण जखमी

Actor Arrested: प्रसिद्ध अभिनेत्याला हत्याकांड प्रकरणात अटक, सुप्रीम कोर्टानं जामीन नाकारल्यानंतर कारवाई

Bihar SIR : वगळलेल्या ६५ लाख मतदारांची यादी कारणांसहित प्रसिद्ध करा; निवडणूक आयोगाला 'सुप्रीम' आदेश

Nashik News: 36 दिवसांपासूनचे नाशिकमधील आदिवासींचे आंदोलन चिघळले; पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट|VIDEO

Maharashtra Live News Update: बिऱ्हाड आंदोलकांनी पुन्हा नव्याने दिला अल्टिमेटम

SCROLL FOR NEXT