RBI Update On 2000 Note saamtv
बिझनेस

Rupees 2000 Note: 2000 च्या नोटांबाबत मोठी अपडेट; अजूनही 6017 कोटी रुपयांच्या नोटा चलनात

RBI Update On 2000 Note: दोन हजार रुपयांच्या ६०१७ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या नोटा चलनात आहेत. जुलै २०२५ पर्यंत ३,००,८५,००० च्या नोटा अद्याप परत केल्या गेल्या नाहीत किंवा बँकांमध्ये जमा केल्या गेल्या नाहीत असे आरबीआयने सांगितले आहे.

Bharat Jadhav

  • १९ मे २०२३ रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या.

  • आरबीआयनं सादर केलेल्या आकडेवारीनुसार ६०१७ कोटी रुपये अजूनही चलनात आहेत.

  • ३ कोटींहून अधिक ₹2000 नोटा अजून बँकेत जमा झालेल्या नाहीत.

  • या नोटा अद्यापही काही व्यक्तींच्या ताब्यात असण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

दोन हजार रुपयांच्या नोटा बंद होऊन २ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने १९ मे २०२३ रोजी २००० रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली होती. आरबीआयनं २००० रुपयांच्या नोटा बदलण्यास पुरेसा वेळ दिला होता. नोटा बंद करून जवळपास दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झालाय. तरीही ६०१७ कोटी रुपये अजून चलनात आहेत. याचा अर्थ २००० रुपयांच्या ३,००,८५,००० नोटा अजूनही बॅकेत जमा झालेल्या नाहीत. याबाबत अधिकृत आकडेवारी आरबीआयने दिलीय.

२००० रुपयांच्या नोटा कायदेशीर चलनात राहतील. चलनात २००० रुपयांच्या नोटा १९ मे २०२३ रोजी व्यवहारातून बाद झाल्या आहेत. तेव्हा चलनात असलेल्या २००० रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य ३.५६ लाख कोटी रुपये होते. दरम्यान ३१ जुलै २०२५ पर्यंत व्यवहारातून बाद झालेल्या नोटांचे प्रमाण ६०१७ कोटी रुपयांवर आले आहे. अशाप्रकारे १९ मे २०२३ पर्यंत चलनात असलेल्या २००० रुपयांच्या ९८.३१ टक्के नोटा परत आल्या आहेत आणि १.६९ टक्के अजूनही चलनात आहेत.

आरबीआयने स्पष्ट केले आहे की, २००० रुपयांच्या नोटा अजूनही वैध चलन आहेत. म्हणजेच, त्यांच्याद्वारे व्यवहार केले जाऊ शकतात. परंतु बँका आणि दुकानदार त्या स्वीकारण्यास नकार देणे सामान्य झाले आहे. जर तुमच्याकडेही २००० हजाराच्या नोटा असतील तर त्या तुम्ही आरबीआयच्या १९ इश्यू ऑफिसमध्ये तुमच्या बँक खात्यात जमा करू शकतात.

ही इश्यू ऑफिसेस अहमदाबाद, बेंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, दिल्ली, पाटणा आणि तिरुवनंतपुरम येथे आहेत. ही सुविधा ९ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू आहे. यासह तुम्ही देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जमा करू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Ketu Yuti: 2 दिवसांनी बनणार बुध-केतूचा संयोग; 'या' राशींना मिळू शकणार धनलाभ, उत्तम संधी चालून येणार

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा एकच इशारा; नंतर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार-खासदारांनी लावली रांग

Maratha reservation: मनोज जरांगेंना अवघ्या 1 दिवसाच्या आंदोलनाची परवानगी, काय आहेत न्यायालयाच्या अटी

Tariff War: पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन मोडवर! ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात आखला 'स्पेशल ४०'चा प्लॅन

Raj And Uddhav Thackeray Meets: तब्बल 20 वर्षांनी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर, ठाकरे बंधूंच्या भेटीचा राजकीय अर्थ काय?

SCROLL FOR NEXT