RBI Repo Rate  Saam Tv
बिझनेस

RBI Repo Rate: आरबीआयकडून नवीन रेपो रेट जारी; वाचा होम, कार लोनवर काय परिणाम होणार

RBI Repo Rate Unchanged: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

Siddhi Hande

रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय

रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची घोषणा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एका सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नाही. रेपो रेट हा ५.५ टक्के कायम ठेवला आहे. यामुळे होम लोन, वैयक्तिक लोन, कार लोनवरील व्याजदरात कोणताही बदल होणार नाहीये. गेल्या तीन दिवसांपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पतधोरण बैठक सुरु होती. आज या बैठकीचा शेवटचा दिवस होता. या दिवशी आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याबाबत घोषणा केली आहे.

होम लोन, कार लोनवर काय परिणाम होणार?

आता सध्या रेपो रेट ५.५ टक्के होता. त्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे होम लोन, कार लोन किंवा वैयक्तिक लोनवर कोणताही परिणाम होणार नाही. तुमचा कर्जाचा ईएमआय वाढणार नाहीये. दरम्यान, जर तुमच्यावर ६० लाखांचे लोन असेल आणि त्यावर ८.५ टक्के व्याजदर असेल तर तुम्हाला ५२,०२६ रुपये ईएमआय भरावा लागतो.दरम्यान, रेपो रेटमध्ये कोणताही बदल न झाल्याने आता ईएमआय ना वाढणार किंवा कमी होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

रेपो रेटवर ठरवला जातो कर्जाचा हप्ता

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर तीन महिन्यांनी नवीन रेपो रेट जारी करते. रेपो रेटवर कर्जाचे व्याजदर ठरवले जाते. हा रेपो रेट सर्व बँकांना फॉलो करावा लागतो. त्यावर आधारित कर्जावरील व्याजदर ठरवले जाते. त्यामुळे जर रेपो रेट बदलला नाही तर कर्जावर काहीच परिणाम होणार नाहीये.

वर्षभरात तीन वेळा रेपो रेटमध्ये कपात

मागील वर्षभरात रेपो रेटमध्ये तीन वेळा कपात करण्यात आली होती. यामुळे रेपो रेट जवळपास १०० बेसिस पॉइंट्स म्हणजे १ टक्क्यांनी कमी झाला होता. वर्षाच्या सुरुवातीला रेपो रेट ६.५ टक्के होता. हा रेपो रेट आज ५.५ टक्के निश्चित करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: इथेच बिबट्याला गोळ्या मारा, शिरूरमधील ग्रामस्थ आक्रमक

Mangalwar Upay: पैसा अन् सुख समृद्धीसाठी मंगळवारी करा हे उपाय, होईल फायदा

Mumbai School News : हातावर मेहंदी काढली म्हणून १५ ते २० मुलींना काढले वर्गाबाहेर, मुंबईतील शाळेचा धक्कदायक प्रकार!

रूग्णालयात हॅकर्सची नजर; महिलांचे खासगी व्हिडिओ लीक, हजारो क्लिप पॉxxx साईटवर अपलोड

द्राक्ष पंढरीत खळबळ! शेतकरी बागेत फिरायला गेला आणि... काही क्षणांत घेतलं विष|VIDEO

SCROLL FOR NEXT