RBI Repo Rate Saam
बिझनेस

Repo Rate : होम अन् कार लोन घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI च्या इशाऱ्याने चिंता वाढली, वाचा लेटेस्ट अपडेट

RBI Repo Rate : RBI रेपो रेट वाढवण्याची शक्यता असल्याने होम आणि कार लोन घेणाऱ्या ग्राहकांच्या EMI वाढण्याची चिंता आहे. पुढील महिन्यात होणऱ्या आरबीआयच्या बैठकीत हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

RBI repo rate hike impact on home loan EMI : तुम्ही जर घर (Home Loan) किंवा गाडी (Car Loan) घेण्यासाठी बँक लोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. येत्या काही दिवसांत आरबीआय व्याजदरात (Repo Rate) मोठी वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिग्गज अर्थतज्ज्ञांच्या मते, महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरबीआय ऑक्टोबर आणि डिसेंबरच्या बैठकीत रेपो रेट 0.25-0.25 बेसिस पॉईंट्सने वाढवू शकते.

आरबीआयने रेपो रेट वाढवल्यास बँकांना मिळणारे कर्ज महाग होईल. त्याचा थेट फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. यामुळे बँका आपल्या सर्व प्रकारच्या कर्जांवरील व्याजदर वाढवतील. त्यामुळे तुमच्या लोनचा 'ईएमआय' (EMI) थेट वाढू शकतो. एकीकडे लोन महागण्याची भीती असताना, दुसरीकडे फिक्स डिपॉझिट (FD) करणाऱ्या ग्राहकांना मात्र या वाढीव व्याजदरांचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. आरबीआयच्या निर्णायामुळे लोनधारकांच्या चिंता वाढली आहे.

महागाई पुन्हा वाढू लागल्याने आणि जागतिक पातळीवर घडणाऱ्या विविध घडामोडींमुळे RBI येत्या काळात रेपो रेट (व्याजदर) वाढवण्याचा विचार करत आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर पुन्हा एकदा १०० डॉलर प्रति बॅरलवर पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तेल महागल्यास सर्वच वस्तूंचे भाव वाढतात.

'अल निनो'च्या प्रभावामुळे हवामानात मोठे बदल होऊन शेती आणि पिकांवर वाईट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे अन्नधान्याचे भाव वाढू शकतात. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदर वाढवल्यामुळे भारत आणि अमेरिकेतील व्याजदरांमधील अंतर कमी होत आहे, ज्याचा परिणाम चलनावर आणि परदेशी गुंतवणुकीवर होतो.

नुकत्याच समोर आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार, देशातील किरकोळ महागाईचा दर जुलै मधील ४.४५% वरून ऑगस्ट महिन्यात ४.८२% वर पोहोचला आहे. या सर्व कारणांमुळे बाजारातील वाढती महागाई रोखण्यासाठी आरबीआयकडे व्याजदर वाढवणे हाच एक प्रमुख पर्याय उरतो. दरम्यान, RBI ने रेपो रेट वाढवला, तर सर्व बँका आणि फायनान्स कंपन्या त्यांच्या फिक्स डिपॉझिट (FD) वर मिळणाऱ्या व्याजाचे दरही वाढवू शकतात. म्हणजेच ज्यांची आधीपासून एफडी (FD) आहे किंवा जे येत्या काही महिन्यांत नवीन एफडी करणार आहेत, त्यांना आता चांगला परतावा मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वसई-विरारमध्ये गणेश विसर्जनावरून तणाव! तलावाचा गेट तोडून ग्रामस्थांनी केले गणरायाचे विसर्जन

UPI New Rules : ₹2,000 पेक्षा जास्त UPI पेमेंटवर लागणार शुल्क? 15 ऑक्टोबरपासून काय बदलणार, जाणून घ्या

Fashion Tips: कमी खर्चातही दिसाल एकदम क्लासी! ऑफिस किंवा समारंभात 'या' ७ स्टायलिंग टिप्सने मिळेल ग्लॅमरस लूक

Milk Tea : सकाळी उठताच दुधाचा चहा पिताय? सावधान! सवय पडेल महागात, ५ गंभीर दुष्परिणाम एकदा वाचा

Lockdown : भारताच्या शेजारील देशात लॉकडाऊन, रात्री ८ नंतर सर्वकाही बंद; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT