सध्या महागाई खूप जास्त वाढत आहे. त्यामुळे कोणतीही वस्तू रोख रक्कम देऊन खरेदी करणे अनेकांच्या खिशाला परवडणारे नसते. यामुळे अनेकजण महागड्या वस्तू ईएमआयवर खरेदी करतात. अगदी मोबाईलपासून ते घरांपर्यंत अनेक गोष्टी ईएमआयवर खरेदी करतात. दरम्यान, आता ईएमआयवर फोन खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. (RBI New Rule)
आता जर तुम्ही ईएमआयवर फोन खरेदी केला असेल आणि त्याचे लोन भरणे तुम्हाला जमले नाही तर तुमचा फोन लॉक केला जाणार आहे. करदाते तुमचा फोन लॉक करु शकणार आहेत. यासाठी रिझर्व्ह बँकेने नवीन नियम लागू करणार आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, जवळपास एक तृतीयांशपेक्षा जास्त ग्राहक ईएमआयवर फोन खरेदी करतात. क्रेडिट ब्युरो CRIF हायमार्कच्या मते, १ लाखांपेक्षा कमी कर्ज घेऊन ईएमआय भरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळेच रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे.
फोन लॉक असेल पण डेटा सुरक्षित राहणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्ज बुडवणाऱ्या कर्जदारांचे फोन लॉक करणे थांबवण्यास सांगितले होते. त्यानंतर आता पुन्हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्ज देताना कर्जदारांत्या मोबाईलवर एक अॅप डाउनलोड केले जाईल. कर्जदारांशी चर्चा केल्यानंतर आरबीआय पुढच्या काही महिन्यात फेअर प्रॅक्टिस कोड अपडेट करण्यासह फोन लॉकिंग यंत्रणेबाबत मार्गदर्शक तत्वे जारी करु शकते.
आरबीआय ग्राहकांना हे सुनिश्चित करु शकते की, कर्ज देणारे फोन लॉक करुन कर्जाची रक्कम वसूल करु शकतील. याचसोबत त्यांचा पर्सनल डेटा सुरक्षित ठेवला जाईल. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिची समोर आलेली नाही. आरबीआयने हा नियम लागू केला तर फोनसाठी कर्ज देणाऱ्या कंपन्यांना फायदा होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.