Bank Rules Saam tv
बिझनेस

Bank Rules: मृत्यूनंतर बँक खात्यातील पैशाचं काय होतं? RBI ने जारी केले नवीन नियम

Bank Rules After Death of Account Holder: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या बँक खात्याची सर्व प्रोसेस १५ दिवसांत करायची आहे.

Siddhi Hande

प्रत्येकाचे बँकेत अकाउंट असते. बँकेत जवळपास सर्वांचेच पैसे असतात. परंतु जर एखाद्या ग्राहकाचा मृत्यू झाला तर त्या बँक अकाउंटचं काय होतं असा प्रश्न अनेकांना आला आहे. बँकेच्या ग्राहकाचा मृत्यू झाला तर कुटुंबातील सदस्यांनी पैसे किंवा लॉकरच्या वस्तूंचा दावा करु शकतात. यासाठीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

आता पैसे आणि लॉकरमधील वस्तूंसाठी दावा केला तर बँकेला सर्व कागदपत्र मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत प्रक्रिया करावी लागेल. म्हणजेच हे खातं नॉमनीच्या अकाउंटवर ट्रान्सफर करायचे असेल बंद करायचे असेल किंवा लॉकरमधील वस्तू कोणाकडे द्यायच्या असतील तर ही प्रक्रिया १५ दिवसांत पूर्ण करावी लागेल. जर उशीर केला तर बँकेला मोठा दंड भरावा लागेल.

रिझर्व्ह बँकेचा हा नियम १ जानेवारी २०२६ पासून लागू करण्यातयेईल. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील सदस्यांना बँकेकडून पैसे मिळवण्यासाठी किंवा लॉकरमधील वस्तू मिळवण्यासाठी खूप वेळा चालणारी प्रक्रिया होती. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. परंतु आता आरबीआयने ही प्रोसेस १५ दिवसांत पूर्ण करण्यास सांगितले आहे. त्यामुळे बँका आता कोणताही विलंब करु शकणार नाहीत.त्यामुळे खातेधारकांच्या कुटुंबाला फायदा होणार आहे.

बँक खात्याचे नियम

जर एफडीमध्ये विलंब झाला तर बँकेला ४ टक्क्याने व्याज द्यावे लागेल. जर लॉकर उघडण्यास बँकेला उशिर झाला तर ज्याचे लॉकर आहे त्याच्या नॉमिनीला दर महिन्याला ५००० रुपये द्यावे लागतील.

बँक लॉकरचे नियम

नॉमिनी किंवा जॉइंट अकाउंटधारकांना लॉकरसाठी तत्काळ प्रवेश मिळेल. मात्र, या व्यक्ती नसतील तर कायदेशीर वारसदारांना सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर लॉकरमधील वस्तू मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : कोहली-रोहितची आज अग्निपरीक्षा, पर्थमध्ये पहिला वनडे, वाचा प्लेईंग ११ अन् सर्वकाही

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

SCROLL FOR NEXT