RBI New Rule: google
बिझनेस

RBI New Rule: आरबीयने बँकेच्या नियमात केला मोठा बदल; ग्राहकांच्या परवानगीशिवाय नाही देणार कोणत्याही योजनांची ऑफर

RBI Banking Rules: तुम्ही बँकांमध्ये महत्वाचे व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण यामध्ये तुमची फसवणूक टाळण्यासाठी आरबीआय बँकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Sakshi Sunil Jadhav

तुम्ही जर बँकेतून लोन घेत असाल, क्रेडिट कार्ड बनवत असाल किंवा बँकेत गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) चुकीच्या पद्धतीने योजना विकणाऱ्यांना आणि मिस सेलिंग करणाऱ्यांना थांबवण्यासाठी नवे नियम लागू केले आहे. याने ग्राहकांचे संरक्षण होईल. व्यवहार करताना कोणत्याही चुकीच्या किंवा गरज नसलेल्या गोष्टींना ग्राहकांना बळी पडता येणार नाही.

सध्या बँकांकडून जबरदस्ती विक्री (Mis-selling), ग्राहकांची दिशाभूल आणि डिजिटल माध्यमांतून होणाऱ्या फसव्या पद्धतींवर आळा घालण्यासाठी आरबीआय बँक नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेत आहेत.त्यामध्ये ग्राहकांना या समस्यांना सामोरं जावं लागणार नाही. हा १ जानेवारी २०२७ पासून नवीन नियम लागू होणार आहेत.

बऱ्याचदा ग्राहक होम लोन किंवा वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी बँकेत जातात तेव्हा त्यांना संबंधित बँकेच्या भागीदार कंपनीचा विमा खरेदी करा असा दबाव टाकला जातो. काहीवेळेस मोबाईल अॅप किंवा ऑनलाइन फॉर्ममध्ये ग्राहकांच्या नकळत काही सेवा त्यांना दिल्या जातात किंवा अॅक्टीवेट केल्या जातात. अशा तक्रारींमध्ये वाढ झाल्यावर आरबीआयने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यात ग्राहकांच्या परवानगीशिवाय कोणतंही उत्पादन किंवा सेवा सुरु करता येणार नाही.

आरबीआयने सर्वात आधी‘मिस-सेलिंग’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांच्या गरजा आणि आर्थिक स्थितीची तपासणी न करता त्यांना उत्पादनं विकणं, चुकीची किंवा अर्धवट माहिती देणं, त्यांच्या स्पष्ट परवानगीशिवाय सेवा सुरू करणं किंवा कर्ज मंजुरीसाठी विमा खरेदीची अट घालणं यांचा यामध्ये समावेश आहे. जर अशा प्रकारची चूक सिद्ध झाली, तर संबंधित बँकेला ग्राहकांचे संपूर्ण पैसे परत करावे लागतील. तसेच ग्राहकाला झालेल्या नुकसानाची भरपाई सुद्धा द्यावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात पोलिसावर जीवघेणा हल्ला, भररस्त्यात चौघांकडून चाकूने सपासप वार

Medu Vada Recipe : ना डाळ भिजवायची, ना पीठ आंबवायचं! 'या' पदार्थापासून झटपट बनवा कुरकुरीत मेदू वडा

Rahul Gandhi: राहुल गांधींचं विमान लँड न होता पुन्हा हवेत झेपावलं; लखनौ एअरपोर्टवर नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, भोगावती नदीवरील पुलावर वाहनांच्या रांगा

Tambyachya Bhandyatil Pani: तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने काय फायदे होतात?

SCROLL FOR NEXT