UPI Update 
बिझनेस

महत्वाची बातमी! आता UPIने 10,000 रुपये ट्रान्सफर करता येणार नाही? RBI ने ठेवली एक अट, वाचा नवे नियम

Digital Payments Rule : RBI ने UPI व्यवहारासाठी नवीन सुरक्षा नियम सुचवले आहेत. ₹10,000 पेक्षा जास्त रक्कम नवीन खात्यावर पाठवताना 1 तासाचा होल्ड लागू शकतो, ज्यामुळे फसवणूक टाळण्यास मदत होईल.

Sakshi Sunil Jadhav

RBI ने UPI बद्दल नवा नियम लागू केला

नवीन लाभार्थी (new beneficiary) यांना पैसे पाठवताना हा नियम लागू

APP फ्रॉड आणि ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी निर्णय घेतला

सध्या सगळं यूग हे डिजीटल गोष्टींचा वापर करत आहे. त्यामध्ये सगळ्यात जास्त वापर हा कॅश ऐवजी ऑनलाइन पेमेंटचा केला जातो. १ रुपयाच्या चॉकलेटचे बील सुद्धा ऑनलाइन पद्धतीने होऊ शकतं. पण आता तुम्हाला १०,००० पेक्षा जास्त रक्कम पेमेंट करण्यासाठी मध्ये १ तास थांबावे लागेल. हा नवा नियम RBI एका महत्वाच्या कारणासाठी लागू केला आहे.

सगळेच ऑनलाइन पेमेंट करतात. पण आता त्यामध्ये बऱ्याच फसवणुकींना सामोरं जावं लागतं. यामुळे लोकांना डिजीटल पेमेंट करणं सोयीचं वाटत नाही. यालाच आळा घालण्यासाठी आणि Authorised Push Payment (APP) Fraud थांबवण्यासाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India ) मोठा निर्णय घेतला आहे. डिजिटल व्यवहार जास्त सुरक्षित करण्यासाठी या बॅंकेने १०,००० पेक्षा जास्त रकमेच्या ट्रान्झॅक्शनवर नवीन सुरक्षा नियम सुचवले आहेत. जे पुढील प्रमाणे आहेत. यामुळे सगळ्यात UPI युजर्सना फायदा होणार आहे.

UPI पेमेंटचे नवे नियम काय?

जर तुम्ही १०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम एखाद्या नवीन व्यक्तीच्या युपीआय अकाउंटवर पाठवत असाल तर, त्या व्यवहारावर 1 तासाचा होल्ड लागू शकतो. म्हणजेच, पैसे ताबडतोब ट्रान्सफर होणार नाहीत. ट्रान्सफर होण्याआधी १ तास तुम्हाला वाट पाहावी लागेल. तुम्ही या वेळेत तुमचा व्यवहार रद्द सुद्धा करु शकता. APP फ्रॉड थांबवण्यासाठी तुम्हाला याचा जबरदस्त फायदा होणार आहे.

RBI चा हा प्रस्ताव लागू झाल्यावर डिजिटल व्यवहार करताना थोडा वेळ जास्त लागेल, पण त्याचबरोबर तुमचे पैसे जास्त सुरक्षित राहतील. त्यामुळे घाईत व्यवहार करण्याऐवजी सतर्क राहणं जास्त गरजेचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : पुण्याहून लग्नाहून परत येताना भीषण अपघात, रिक्षाला जोरात धडक, २ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : उत्तर पुणे जिल्ह्यात तापमान ४२° पार; उष्माघाताचा धोका वाढला

दरवाढीचा भडका! LPG सिलिंडर तब्बल ९९३ रुपयांनी महागला; वाचा तुमच्या शहरातील ताजे दर

Friday Horoscope: या राशींनी महत्त्वाच्या निर्णयात घाई करू नये, वाचा आजचं राशीभविष्य

Pune Crime: पुणे हादरले! दुसऱ्याशी लग्न ठरल्याचा राग, तरुणाने घरात घुसून गर्लफ्रेंडवर चाकूने केले सपासप वार

SCROLL FOR NEXT