Home Loan cheaper saam tv
बिझनेस

RBI Repo Rate: रेपो रेटमध्ये मोठी कपात! २०, ३० आणि ५० लाखांच्या गृहकर्जांवर तुमचा EMI किती रुपयांनी कमी होणार? वाचा A टू Z माहिती

Home Loan Cheaper: आरबीआयने रेपो रेटमध्ये मोठी कपात केली. त्यामुळे होम लोन, कार लोन असणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाल आहे. रेपो रेट कमी झाल्यामुळे कर्जावरील ईएमआयचा हफ्ता देखील कमी होणार आहे. किती लाखांच्या कर्जावर किती ईएमआय द्यावा लागेल वाचा सविस्तर...

Priya More

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये मोठी कपात केली. आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला. रेपो रेटमध्ये ५० बेसिक पॉइंट्सची कपात करण्यात आली आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज हा निर्णय जाहीर केला. रेपो रेट कमी करण्यात आल्यामुळे होम लोन कमी होणार आहे. त्यामुळे होम लोन असणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केल्यामुळे आता रेपो रेट ५.५० टक्के असणार आहे. रेपो रेट कमी करण्यात आल्यामुळे होम लोन, कार लोन स्वस्त होणार आहे. त्यामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. जर तुम्ही बँकेकडून कर्ज घेतले असेल तर तुमच्या कर्जाच्या ईएमआयमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. रेपो रेटमध्ये कपात झाल्यानंतर तुमची बॅक देखील व्याजदर कमी करेल. २०, ३० आणि ५० लाखांच्या गृहकर्जावर तुमचा ईएमआय किती असेल? आणि पूर्वीपेक्षा ईएमआय किती कमी असेल हे आपण जाणून घेणार आहोत...

५० लाखांच्या कर्जावर किती ईएमआय?

बँकेकडून तुम्ही ३० वर्षांसाठी ५० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले आहे आणि त्या बदल्यात तुम्ही ९ टक्के व्याज देत आहात. तर तुमचा महिन्याचा ईएमआय ४०,२३१ रुपये होईल. पण आता आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर हा ईएमआय ३८,४४६ रुपये होईल. याचाच अर्थ तुमच्या ईएमआयमध्ये १७८५ रुपयांची कपात होईल.

३० लाखांच्या कर्जावर किती ईएमआय?

जर तुम्ही २० वर्षांसाठी ८.५ टक्के व्याजदराने ३० लाखांचे गृहकर्ज घेतले असेल. तर त्याचा महिन्याला २६,०३५ रुपये ईएमआय द्यावा लागतो.. आता आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केली. जेव्हा बँक कर्जाच्या व्याजात रेपो रेटनुसार कपात करेल तेव्हा व्याज ८ टक्के होईल. म्हणजेच तुम्हाला ३० लाखांच्या कर्जावर ईएमआय २५,०९३ रुपये द्यावा लागेल. ईएमआयमध्ये दरमहा ९४२ रुपये कमी होतील.

२५ लाखांच्या कर्जावर किती ईएमआय?

जर तुम्ही २० वर्षांसाठी २५ लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले असेल. ज्यासाठी तुम्ही ८.५ टक्के व्याज देत आहात. तर तुमचा ईएमआय २१,६९६ रुपये असेल. आता रेपो दरात कपात झाल्यानंतर तुमच्या बँकेच्या ईएमआयमध्ये मोठी कपात होईल. हे व्याज ८ टक्क्यांपर्यंत कमी होईल. ज्यामुळे तुमच्या गृहकर्जाचा ईएमआय २०,९११ रुपये होईल. याचाच अर्थ ईएमआयमध्ये दरमहा ७८५ रुपयांची बचत होईल.

२० लाखांच्या कर्जावर किती ईएमआय?

जर तुम्ही २० लाखांचे कर्ज २० वर्षांसाठी ९ टक्के व्याजदराने घेतले असेल. तर तुम्हाला महिन्याला ईएमआय १७,९९५ रुपये द्यावा लागत असेल. आता रेपो दरात कपात झाल्यानंतर तुमचा ईएमआय १७,३५६ रुपये होईल. म्हणजे तुम्हाला ईएमआयमध्ये ६३९ रुपये कमी द्यावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भयंकर जलप्रलय! आभाळ फाटलं, ८ लोकं, दुकानं अन् जनावरं वाहून गेली, देहरादूनमधील ढगफुटीचा VIDEO समोर

Maharashtra Live News Update:अमरावती मध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये धुसफूस असल्याची चर्चा

Beed : मुलांच्या शिक्षणासाठी खिशात दमडीपण नाही, मराठा बांधवाने उचलले टोकाचे पाऊल, बीडमध्ये हळहळ

Airport Jobs: १०वी,१२वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! एअरपोर्टमध्ये नोकरी करण्याची संधी; १४०० पदांसाठी भरती

Kumbha Rashi : शत्रुंचा सामना, नोकरीतील संधी; वाचा कुंभ राशी आजचे भविष्य

SCROLL FOR NEXT