RBI Saam Tv
बिझनेस

RBI: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! या बँकेचा परवाना केला रद्द, कारण काय?

Rbi Decision : रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. दुर्गा को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

Siddhi Hande

भारतीय रिझर्व्ह बँक इंडियाने मोठे पाऊल उचलले आहे. आरबीआयने विजयवाडा दुर्गा को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने दुर्गा को-ऑपरेटिव्ह बँकेचे लायसन्स रद्द केले आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नसल्याने आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) १२ नोव्हेंबर २०२४ पासून बँकेचे सर्व काम बंद केले आहे. त्यामुळे सर्व व्यव्हार बंद करण्यात आसे आहे. त्याचसोबत आंध्र प्रदेशमधील कमिश्नर फॉर को-ऑपरेशन आणि को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या बँक बंद करण्याचे आणि लिक्विडेटरची नियुक्ती करण्याचे आदेश जारी केले आहेत.

आरबीआयने म्हटले आहे की, बँकेने बँकिंग नियमन कायदा, १९४९ चे नियम पाळले नाहीत. दुर्गा ऑपरेटिव्ह अर्बन बँक सुरु राहणे तिच्या ठेवीदारांसाठी चांगले नाही. सध्याच्या आर्थिक स्थितीमुळे बँक तिच्या ठेवीदारांना पूर्ण परतावा देऊ शकणार नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

५ लाखांपर्यंत रक्कम सुरक्षित

दुर्गा को-ऑपरेटिव्ह बँकेचे लिक्विडेशन झाल्यानंतर, बँकेच्या ठेवीदारांना ठेवींवर विमा आणि क्रेडिट गँरंटी कॉर्पोरेशनकडून ५ लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत वीमा दाव्याची रक्कम प्राप्त करण्याचा अधिकार आहे.बँकेने सादर केलेल्या डेटानुसार, ९५.८ टक्के ठेवीदारांना ठेवीची संपूर्ण रक्कम मिळण्याचा अधिकार आहे. (RBI Bank)

याआधी जुलै महिन्यात आरबीआयने कर्नाटकस्थित शिमशा सहकार बँकेचा परवाना रद्द केला होता. त्या बँकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ५ जुलै २०२४ नंतर बँक ऑपरेशन्स बंद केले होते. आरबीआयने उत्तर प्रदेशमधील गाझीपूर येथील सहकारी बँकेचा परवाना रद्द केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

Trump Putin Summit : भारतावरचा टॅरिफ रद्द होणार? ट्रम्प-पुतीन भेटीत काय घडलं?

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवात ७५ गोविंदा जखमी, काहींची प्रकृती गंभीर, एकाचा मृत्यू

Dog Bite: दिसेल त्याचे तोडले लचके;इंदापुरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ,सीसीटीव्हीत घटना कैद

SCROLL FOR NEXT