RBI Saam Tv
बिझनेस

RBI: रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! या बँकेचे लायसन्स केले रद्द; तुमचं खाते नाही ना?

RBI Cancelled Licence Of These Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने या बँकेचे लायसन्स रद्द केले आहे.

Siddhi Hande

रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय

रिझर्व्ह बँकेने एका बँकेचा परवाना केला रद्द

ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्नाटकच्या कारवार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे लायसन्स रद्द केले आहे. आता ही बँक २३ जुलै २०२५ पासून कोणतीही बँकिंग सर्व्हिस देऊ शकणार नाहीये. या बँकेकडे आवश्यकतेनुसार कॅपिटल नव्हते. त्यामुळे बँकेने रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. बँकेकडे भविष्यात कोणताही नफा कमावण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.

रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे की, कारवार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ही आर्थिक संकटाचा सामना करत आहे. बँकेकडे आवश्यक भांडवल नव्हते. तसेच ग्राहकांच्या एफडीदेखील सुरक्षित ठेवण्याची स्थिती नव्हती. म्हणूनच रिझर्व्ह बँकेने हा परवाना रद्द केला आहे. आणि रजिस्ट्रार ऑफ को-ऑपरेटिव्ह सोसायटीड कर्नाटक यांना बंद करण्याचे किंवा लिक्विडेर नियुक्त करण्यास सांगितले.

ठेवीदारांना काय मिळेल?

आरबीआयने सांगितले की, बँक बंद झाल्यानंतर प्रत्येक ठेवीदाराला डिपॉझिट इन्श्युरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) अंतर्गत जास्तीत जास्त ५ लाख रुपये परत केले जाती. म्हणजे ज्यांची ठेव रक्कम ही ५ लाखांपेक्षा कमी आहे त्यांना सर्व पैसे परत मिळतील.

बँकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, ९२.९ टक्के ठेवीदारांना त्यांची सर्व रक्कम परत मिळेल.डीआयसीजीने ३० जून २०२५ पर्यंत ३७.७९ कोटी रुपयांचे पेमेंट आधीच केले होते.आरबीआयने म्हटले आहे की, बँकेकडे व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. तसेच भविष्यात पैसे कमावण्याची शक्यतादेखील नाही. त्यामुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

ग्राहकांसाठी सूचना

ज्या ग्राहकांचे बँकेत पैसे आहेत त्यांनी DICGC द्वारे त्यावर दावा करा. संपूर्ण प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर ग्राहकांना त्यांचे पैसे परत मिळणार आहे. ग्राहकांच्या पैशांचे संरक्षण करण्यासाठी आणि आर्थिक व्यवस्था चांगली करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

ग्राहकांचे पैसे सुरक्षित आहेत का?

DICGC अंतर्गत प्रत्येक ठेवीदाराला ५ लाख रुपयांपर्यंत परतावा मिळेल.

आरबीआयने कोणत्या बँकेचा परवाना रद्द केला आहे?

आरबीआयने कर्नाटकातील कारवार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला आहे.

बँकेचे लायसन्स का रद्द करण्यात आले?

बँकेकडे आवश्यक भांडवल नव्हते आणि भविष्यात नफा कमावण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे आरबीआयने हा निर्णय घेतला.

पैसे परत मिळवण्यासाठी काय करावे लागेल?

संबंधित ग्राहकांनी DICGC च्या माध्यमातून दावा करावा. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पैसे खात्यात जमा होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivali Parab: एकदम झक्कास! ‘हास्यजत्रा’ फेम शिवालीचे हटके फोटोशूट पाहिलंत का?

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा दणका; हा माजी आमदार भाजपच्या वाटेवर? VIDEO

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात पावसाची रिपरिप; बळीराजा सुखावला

Badam Shake : फक्त ५ मिनिटांत बनवा बदाम शेक, वाचा रेसिपी

Maharashtra Politics : ठाकरेंसोबत आमदार-खासदार फक्त नावाला, लवकरच भाजपात दिसतील, संकटमोचकाच्या वक्तव्यने राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT