RBI Google
बिझनेस

RBI चा मोठा निर्णय! आता या खातेधारकांसाठी डिजिटल सेवा सुरु; कोट्यवधी ग्राहकांना होणार फायदा

RBI Annoucement of Saving Bank Deposits: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. आता बेसिग सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंटधारकांना डिजिटल सेवा मिळणार आहे.

Siddhi Hande

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठी घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँकेने आता बेसिग सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंटधारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.आता १ ऑक्टोबरपासून या अकाउंटधारकांसाठी डिजिटल सेवा सुरु होणार आहे. याबाबत आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी घोषणा केली आहेत.

आता बीएसबीडीए अकाउंटधारकांना याचा फायदा होणार आहे. आतापर्यंत फक्त डिजिटल आणि ऑनलाइन बँकिंगा सेवा फक्त बचत खात्यांसाठी उपलब्ध होता. त्यानंतर आता बेसिक सेव्हिंग अकाउंटधारकांनाही डिजिटल बँकिंगचा वापर करता येणार आहे. यामुळे अनेकांना फायदा होणार आहे.

संजय मल्होत्रा काय म्हणाले?

संजय मल्होत्रा यांनी चलन धोरण जाहीर करताना सांगितले की, बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंवर डिजिटल बँकिंग सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे अनेकांना घरबसल्या बँकिंग सुविधांचा फायदा घेता येणार आहे. सध्या बीएसबीडीवर एफडी आणि पैसे काढण्याची सुविधा आहे. तसेच एटीएमदेखील होते. मात्र, या खात्यासाठी डिजिटल बँकिंग सुविधा उपलब्ध नव्हत्या.

कोट्यवधी खातेधारकांना होणार फायदा

लोकसंख्येच्या मोठ्या वर्गाला बँकिंग सुविधेचा लाभ देण्यासाठी आरबीआयने बीएसबीजी खाते उघडण्यास परवानगी दिली होती. याद्वारे मुलभूत बँकिंग सेवा दिली जाते. ग्राहकांना काही सुविधा मोफत मिळतात. या खात्यात तुम्हाला कोणतीही रक्कम शिल्लक ठेवण्याची आवश्यकता नाही. दरम्यान, आता या डिजिटल सेवांमुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar Crime : संभाजीनगर हादरले; मुलाच्या डोळ्यादेखत भररस्त्यात वाहिलांची हत्या, जुन्या वादातून भयानक कृत्य

Fat burning: फॅट बर्न आणि अँटी-एजिंगसाठी दिवसातून एकदाच जेवण पुरेसं? तज्ज्ञांनी सांगितलं ‘वन मील अ डे’ डाएटचं सिक्रेट

Relationships Tips : जोडीदार सोबत असताना झोप येते, चांगलं की वाईट? वाचा तज्ज्ञांनी काय सांगितले

Maharashtra Dasara Melava Live Update : शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत दिली जाणार-अजित पवार

Crime News : कोयत्याने वार करत पतीने घेतला पत्नीचा जीव, त्यानंतर मृतदेहाजवळ बसला, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT