RBI Saam Tv
बिझनेस

Credit Card : आरबीआयचा क्रेडिटधारकांना मोठा झटका; ही सुविधा झाली बंद, काय आहेत नवीन गाईडलाइन?

Credit Card News : आरबीआयचा क्रेडिटधारकांना मोठा झटका दिलाय. आरबीआयने नवीन गाईडलाइन जारी केली आहे.

Vishal Gangurde

RBI ने क्रेडिट कार्डने घरभाडे भरण्याची सुविधा १५ सप्टेंबर २०२५ पासून बंद

KYC उल्लंघन आणि फसवणूक प्रकरणांमुळे ही कारवाई

PhonePe, CRED, Paytm यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर ही सेवा बंद

रिवॉर्ड्स, कॅशबॅक आणि भाडे भरण्याच्या सुविधा मिळणार नाहीत

क्रेडिट कार्डधारकांसाठी एक मोठी बातमी समोर आलीये. क्रेडिट कार्डद्वारे घरभाडे भरण्याची सुविधा आता बंद करण्यात आली आहे. PhonePe, Paytm, CRED, Amazon सारख्या पेमेंट प्लॅटफॉर्मवरून ही सेवा 15 सप्टेंबर 2025 पासून पूर्णपणे बंद होणार आहे.

काही वर्षांपूर्वी ही सेवा ग्राहकांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाली होती. कारण यामार्फत रिवॉर्ड पॉइंट्स, कॅशबॅक आणि इतर फायदे मिळायचे. मात्र, आता आरबीआयने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करत सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलाय.

सेवा बंद का करण्यात आली?

आरबीआयने ही सेवा केवायसी नियमांचे उल्लंघन आणि फसवणुकीचे प्रकार वाढल्यामुळे बंद केली आहे. अनेकदा भाडे भरण्याच्या नावाखाली काही लोक आपल्याच ओळखीच्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करायचे. त्यामुळे वास्तविक व्यवहाराची पडताळणी होत नव्हती. त्याचा गैरवापर वाढला.

कोणता बदल झालाय?

पूर्वी भाडेकरू क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट अ‍ॅपच्या मदतीने थेट घरमालकांच्या खात्यात पैसे पाठवायचे. त्यामुळे त्यांना रिवॉर्ड पॉइंट्स आणि क्रेडिट सुविधा मिळायच्या. तसेच त्यांच्या मासिक खर्च नियोजनात उपयोगी पडायचं. पुढे 2024 सालापासून बँकांनी या व्यवहारांवर शुल्क आणि निर्बंध लावायला सुरुवात केली. एचडीएफसी बँकेने जून 2024 पासून 1% शुल्क आकारायला सुरुवात केली. आयसीआयसीआय आणि एसबीआय कार्ड्सने यावर रिवॉर्ड पॉइंट्स देणे बंद केले. एसबीआय कार्डने शुल्क वाढवले.

फिनटेक कंपन्यांचा निर्णय

2024 मध्ये काही फिनटेक कंपन्यांनी आधीच ही सेवा बंद केली होती. आता आरबीआयच्या नव्या नियमांनुसार, सप्टेंबर 2025 पासून ही सेवा पूर्णपणे बंद होणार आहे. त्यामुळे आता क्रेडिट कार्ड वापरून घरभाडे भरण्याचा पर्याय पुढे उपलब्ध राहणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बायकोला खांबाला बांधलं, नवऱ्याकडून लाथाबुक्क्या अन् बेल्टने अमानुष मारहाण; मुलं विनवणी करत राहिले पण...

Traffic Block: वाहतूक कोंडीनं घेतला चिमुरड्याचा जीव; मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २५ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Vote Chori: राहुल गांधींचा नवा आरोप; राजुरात 6853 मतं वाढवल्याचा आरोप

Maharashtra Politics : बाळासाहेबांशेजारी दिघेंचा फोटो; शिंदे-ठाकरे सेनेत जुंपली, VIDEO

OBC Vs Maratha: लक्ष्मण हाकेंना मारण्यासाठी 11 जणांची टीम, मराठा नेते आक्रमक

SCROLL FOR NEXT