Ration Card Saam Tv
बिझनेस

Ration Card: घरबसल्या ऑनलाइन बनवा रेशन कार्ड, या सोप्या स्टेप्स करा फॉलो

Ration Card Application Online Process: घरबसल्या तुम्ही रेशन कार्ड बनवू शकतात. रेशन कार्डवर खूप कमी किंमतीत धान्य आणि जीवनावश्यक वस्तू मिळवू शकतात. रेशन कार्ड बनवण्यासाठी तुम्ही या स्टेप्स फॉलो करा.

Siddhi Hande

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक योजना म्हणजे रेशन कार्ड. रेशन कार्डावर तुम्हाला कमीत कमी किंमतीत धान्य, जीवनावश्यक वस्तू मिळतात. यामुळे नागरिकांना मदत होते.गरीब कुटुंबातील नागरिकांना या योजनेतून मदत होते. मात्र, यासाठी रेशन कार्ड असणे गरजेचे आहे.

रेशन कार्ड हे भारतीयांसाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे. अनेक सरकारी कामांसाठी रेशन कार्डची गरज भासते. त्यामुळे स्वतः जवळ रेशन कार्ड असणे खूप गरजेचे आहे. हे रेशन कार्ड दाखवूनच तुम्ही रेशन दुकानातून धान्य घेऊ शकतात. जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने बनवू शकतात. (Ration card Online Application Process)

रेशन कार्डसाठी ऑनलाइन अप्लाय कसं करावं?

रेशन कार्डसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. यासाठी तुम्हाला रेशन विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर होमपेजवर नवीन रेशन कार्ड किंवा ऑनलाइन अर्ज या लिंकवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन करुन फॉर्म भरावा लागेल.

या फॉर्ममध्ये दिलेली माहिती तुम्हाला भरावी लागेल. त्याचसोबत काही महत्त्वाचे कागदपत्र अपलोड करावे लागतील. यानंतर तुम्ही पुन्हा एकदा फॉर्म वाचा आणि सबमिट करा. यानंतर तु्म्हाला एक रेफरंस नंबर मिळेल. जो तुम्ही स्वतः जवळ नोट करुन ठेवा. याच नंबरमुळे तुम्ही रेशन कार्डचा स्टेट्‍स चेक करु शकतात. (Ration Card Online Application)

असा चेक करा स्टेटस

जर तुम्ही ऑनलाइन अर्ज केला असेल तर तुम्ही त्याचा स्टेट्‍स चेक करु शकतात. यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर अर्जाचा स्थितीवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर ट्रॅक अॅप्लिकेशनवर क्लिक करा. यानंतर तुमच्याकडे असलेला रेफरंस नंबर टाका. यानंतर तुम्हाला तुमच्या रेशन कार्डचा स्टेट्‍स कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

Krunal Pandya: कृणाल पांड्याचा जादूवाला चेंडू पाहून बटलर चक्रावला; क्रिकेटचा देव मात्र भारावला! कृणालचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

RCB vs GT Final: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद; विजयासह रचला इतिहास

पैसे झाडालाच लागतात; व्हिडिओ पाहून तुम्हीही होय म्हणाल, नेमकं प्रकार काय? VIDEO

भाजपकडून विधानपरिषदेसाठी ११ उमेदवारांची नावे जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

SCROLL FOR NEXT