Siddhi Hande
आता प्रत्येक मजुराला रेशन कार्ड मिळणार आहे.
कोणत्याही राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या मजुरांना स्मार्ट रेशन कार्ड देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.
स्मार्ट रेशन कार्डमुळे आता मजुरांना कोणत्याही रेशन दुकानात धान्य मिळणार आहे.
आगामी वर्षात २५ लाख नवीन रेशन कार्डचे प्रमाणीकरण करा. मागील सहा महिन्यात एकदा पण अन्नधान्य न घेतलेल्या शिधापत्रिकांची तपासणी करा.
१०० पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांच्या रेशन कार्डची पुन्हा तपासणी करावी, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.
रेशन दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसवावेत, असेही आदेश दिले आहेत.
दरम्यान, आता प्रत्येक मजुराला स्वतः चे रेशन कार्ड मिळणार आहे त्यामुळे आता मजुरांना स्वस्त किंमतीत रेशन मिळणार आहे.
Next: 'कराड' हे नाव कसं पडलं? जाणून घ्या