Ration Card Google
बिझनेस

Ration Card KYC: रेशन कार्ड केवायसी कसं करायचं? ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धत घ्या जाणून

Ration Card KYC Online Process: रेशन कार्ड केवायसी करणे हे अनिवार्य आहे. तुम्ही घरच्या घरी ऑनलाइन पद्धतीने केवायसी करु शकतात. ऑनलाइन रेशन कार्ड केवायसी कसे करायची याची सोपी पद्धत जाणून घ्या.

Siddhi Hande

रेशन कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे. रेशन कार्डसाठी केवायसी करणे गरजेचे आहे. दर पाच वर्षांनी केवासयी करणे गरजेचे आहे. दरम्यान, आता केवायसी करणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुमचे रेशन कार्ड बंद होऊ शकते. तुम्हाला मोफत धान्य मिळणार नाही. तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने रेशन कार्ड केवायसी करु शकतात.

रेशन कार्डची केवायसी तुम्ही तुमच्या जवळच्या रेशन कार्ड दुकानावर जाऊनदेखील करु शकतात. दुकानावर जाऊन तुम्ही आधार कार्ड द्यायचे आहे. त्यानंतर रेशन कार्ड दुकानदार तुमची केवायसी करेल. दुकानदार पीओएस मशिनद्वारे बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन करेल.त्यानंतर तुमचे केवायसी पूर्ण होणार आहे. याचसोबत तुम्ही ऑनलाइन पद्धतीने केवायसी करु शकतात.

केवायसी करण्याची ऑनलाइन पद्धत (Ration Card KYC Online Process)

सर्वात आधी तुम्हाला Mera KYC आणि Aadhaar FaceRD अॅप डाउनलोड करायचा आहे.

यानंतर तुमचे लोकेशन टाकायचे आहे. तुम्ही ज्या राज्याचे रहिवासी आहात ते टाकायचे आहे.

यानंतर तुम्हाला आधार नंबर, कॅप्चा कोड आणि ओटीपी टाकायचा आहे.

यानंतर तुम्हाला तुमच्या आधारची माहिती स्क्रिनवर दिसेल.

यानंतर तुम्ही Face e-KYC हा ऑप्शन निवडा.

यानंतर कॅमेरामधून तुमचा फेस केवायसी होईल. त्यानंतर फोटोवर क्लिक करा आणि सबमिट करा.

यानंतर तुमची रेशन कार्ड केवायसी पूर्ण होणार आहे.

ई केवायसी झाले की नाही हे या पद्धतीने करा चेक

सर्वात आधी तुम्हाला Mera KYC हे अॅप ओपन करायचे आहे.

यानंतर तुमचे लोकेशन टाका. त्यानंतर आधार नंबर, कॅप्चा कोड आणि ओटीपी टाका.

यानंतर तुम्हाला e KYC आधीच झाले असेल तर स्टेट्‍स Y स्क्रिनवर दिसेल.

जर तुम्ही केवायसी केले नसेल तर Status: N दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prabhas : बाईsss काय हा प्रकार! प्रभासच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये लावली आग, प्रेक्षकांमध्ये उडला गोंधळ, पाहा व्हायरल VIDEO

Maharashtra Live News Update : कांजुरमार्ग पूर्व येथील इमारतीला आग

White Butter Recipe : घरच्या घरी शुद्ध आणि चविष्ट लोणी कसे बनवावे? जाणून घ्या स्टेप्स

Kanda Poha Recipe: मऊ आणि मोकळे कांदा पोहे बनवण्यासाठी 'या' 5 सोप्या टिप्स नक्की लक्षात ठेवा

HSC Hall Ticket: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, हॉल तिकिटाबाबत मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT