Ration Card E KYC News  AI Image
बिझनेस

Ration Card e-KYC Deadline: रेशन कार्डधारकांचे टेन्शन मिटलं, शासनाने e-KYC बाबत घेतला मोठा निर्णय; शेवटची तारीख काय?

Ration Card e-KYC : रेशन कार्डधारकांसाठी e-KYC महत्त्वाची आहे. रेशन कार्ड ज्या जिल्ह्यात बनले आहे तिथेच जाण्याची गरज नाही. जवळच्या स्वस्त धान्य दुकानात, CSC केंद्रावर किंवा खाद्य कार्यलयात आधार कार्डाच्या मदतीने e-KYC करता येते.

Sakshi Sunil Jadhav

Ration Card e-KYC: केंद्र सरकारकडून देशातल्या गरजू नागरिकांसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून दिलं जातं. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरिकांकडे वैध राशन कार्ड असणं आवश्यक आहे. दरम्यान रेशन कार्डधारकांसाठी ई-KYC प्रोसेस पूर्ण करण्याबद्दल सूचना देण्यात आल्या आहेत.

उत्तर प्रदेशातला प्रतापगड जिल्हा रेशन कार्ड ई-केवायच्या बाबतीत आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, प्रतापगडमध्ये ५ लाखांपेक्षा जास्त रेशन कार्डधारक आहेत. यामध्ये ७४,१९० अंत्योदय कार्डधारकांचा समावेश असून, उर्वरित कार्डधारक गृहस्थी श्रेणीतले आहेत. प्रयागराज मंडळातल्या ई-केवायची पूर्ण करण्याच्या बाबतीत प्रतापगडने आघाडी घेतली आहे.

रेशन कार्डची ई-केवायसी कुठे करता येईल?

महत्त्वाची बाब म्हणजे रेशन कार्ड ज्या जिल्ह्यात किंवा राज्यात बनवलं आहे, तिथेच ईकेवायसी करायची असा आवश्यक नाही. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचे रेशन कार्ड कानपूरचे असेल आणि सध्या ती व्यक्ती दिल्लीमध्ये राहत असेल, तर दिल्लीमधूनही ई-केवायसी प्रोसेस पूर्ण करता येऊ शकते.

यासाठी लाभार्थी जवळच्या सरकारी स्वस्त धान्य दुकानात जाऊ शकतात. तिथे POS मशीनच्या माध्यमातून ईकेवायसी प्रोसेस पूर्ण केली जाते. यासाठी आधार कार्डसोबत नेणं गरजेचं आहे. तसेच जवळच्या CSC केंद्रावर किंवा संबंधित जिल्हा खाद्य आणि पुरवठा कार्यालयात जाऊनही ईकेवायसी करता येते. तर ३१ डिसेंबरपर्यंत ईकेवायसीची अंतिम मुदत देण्यात आली आहे. ई-केवायसी न केल्याने रेशन कार्डमधल्या नावावर परिणाम होऊ शकतो, अशी सूचना देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT