Ratan Tata Love Life 
बिझनेस

Ratan Tata Love Life: भारत-चीन युद्धानं मोडलं रतन टाटा यांचं लग्न; जाणून घ्या भारतीय उद्योगपतीची अधुरी प्रेम कहाणी

Bharat Jadhav

भारतातील प्रख्यात उद्योगपती आणि परोपकारी रतन टाटा यांचे निधन झाले आहे. रतन टाटा हे केवळ उद्योगपती नव्हते तर ते भारतीय उद्योगाचे एक आधारस्तंभ होते. त्यांचे जीवन संघर्ष, समर्पण आणि नवनिर्मितीचे प्रतीक होते. त्यांच्या आयुष्यातील अपूर्ण प्रेम कहाणी आपण जाणून घेऊ.

रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ मध्ये पारशी टाटा परिवारमध्ये मुंबई येथे झाला होता. त्यांचे वडील नवल टाटा आणि आईचं नाव सूनू टाटा होतं. रतन टाटा यांनी कम वयातच आपल्या कुटुंबियांच्या व्यवसायाची जबाबदारी संभाळली. रतन टाटा हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांच्या कुटुंबातील सदस्य होते. त्यांनी भारतीय उद्योगात टाटा ब्रँडचा पाया घातला. रतन टाटा यांनी Cornell University यांनी आर्किटेक्चरच्या पदवीचं शिक्षण घेतलं होतं. रतन टाटा यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून पूर्ण केले.

त्यानंतर, ते अमेरिकेत गेले जेथे त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चर आणि अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली. त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीने त्यांच्या विचारसरणीवर अतिशय व्यापक आणि जागतिक दृष्टिकोनाचा प्रभाव पडला होता.

रतन टाटा यांची अपूर्ण प्रेमकहाणी

रतन टाटा यांचे जीवन जितके प्रेरणादायी आणि यशस्वी होते, तितकेच त्यांचे वैयक्तिक जीवन रहस्यमय आणि खासगी ठेवले. ते एक अतिशय नम्र आणि संवेदनशील व्यक्ती होते. त्यांनी कधीच आपले वैयक्तिक जीवन सार्वजनिकपणे उघड केले नाही. त्याच्या जीवनातील मनोरंजक प्रेमकथा देखील आहे. जी वाचून अनेकांना धक्का बसेल आणि डोळ्यात पाणी सुद्धा आणेल.

रतन टाटा यांनी त्यांच्या प्रेम कहाणी एका मुलाखतीत सांगितली होती. १९६० च्या दशकात जेव्हा ते अमेरिकेत शिक्षण घेत होते, तेव्हा त्यांची भेट एका तरुणीशी झाली होती. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. खूप भावनिक प्रेमात अडकल्यानंतर ते दोघेही एकमेकांशी लग्न करण्यास तयार झाले होते. रतन टाटा यांना त्यावेळी अमेरिकेत राहायचे होते आणि ते तिथेच आपले जीवन स्थायिक करण्याचा विचार करत होते. एकदा रतन टाटा यांच्या आजीची तब्येत बिघडली त्यानंतर ते भारतात परतले. त्यावेळी त्यांना वाटलं की त्यांची प्रेयसीही लवकरच भारतात येईल आणि ते लग्न करतील.

पण त्यानंतर १९६२ मध्ये भारत आणि चीनमध्ये युद्ध झाले. त्यावेळी त्यांच्या प्रेयसीच्या कुटुंबाने भारतात येण्यास नकार दिला. त्यामुळे युद्ध परिस्थितीमुळे त्यांची प्रेमकहाणी कधीच पूर्ण होऊ शकली नाही. या घटनेनंतर रतन टाटा यांनी कधीही लग्न केले नाही. त्यांनी आपले जीवन व्यवसाय आणि समाजसेवेसाठी पूर्णपणे समर्पित केले. त्यांची प्रेमकथा आजही एक अत्यंत संवेदनशील कथा म्हणून ओळखली जाते. जे दर्शविते की कधी कधी आयुष्यात काही निर्णय आपल्या अपेक्षेपलीकडील असतात. दरम्यान रतन टाटा यांनी या संदर्भात कधीही कोणालाही दोष दिला नाही. उलट ते जीवनाचा एक भाग मानले.

रतन टाटा आणि सिमी गरेवाल यांची अपूर्ण प्रेमकहाणी

रतन टाटा आणि सिमी गरेवाल यांचे एकेकाळी प्रेमसंबंध होते. ही हा असा किस्सा आहे जी फार कमी लोकांना माहितीये. परंतु सिमी गरेवालने स्वतः या नात्याबद्दल सांगितले होते. "दो बदन" चित्रपटातील अभिनेत्री सिमी गरेवाल हिने एका मुलाखतीत रतन टाटा यांचे कौतुक केले होते. रतन टाटा हे अतिशय सभ्य, मजेदार आणि खरे सज्जन आहेत. रतन टाटा यांच्यासाठी पैशाला कधीच प्राधान्य देत नव्हते, असेही सिमीने म्हटले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratan Tata : दानशूर, उद्योग क्षेत्रातील बापमाणूस...! रतन टाटा यांना पंतप्रधान मोदींसह मान्यवरांकडून श्रद्धांजली

Ratan Tata Journey: अमेरिकेत शिक्षण,ट्रेनी म्हणून नोकरी; रतन टाटा यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा!

Ratan Tata Successor: रतन टाटा यांचा उत्तराधिकारी कोण असेल? ज्याच्या हातात असेल देशातील सर्वात प्रतिष्ठित समूहाची धुरा

Ratan Tata death : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, देशावर शोककळा

IND vs SL W : भारताच्या लेकींनी श्रीलंकेला चारली धूळ; टॉप-२ मध्ये हरमनसेनेची एन्ट्री

SCROLL FOR NEXT