Ratan Tata : दानशूर, उद्योग क्षेत्रातील बापमाणूस...! रतन टाटा यांना पंतप्रधान मोदींसह मान्यवरांकडून श्रद्धांजली

Ratan Tata no more : रतन टाटा यांचा मृत्यू झाल्यनंतर पंतप्रधान मोदींसह मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
 दानशूर, उद्योग क्षेत्रातील बापमाणूस...! रतन टाटा यांना पंतप्रधान मोदींसह मान्यवरांकडून श्रद्धांजली
tata group Saam, tv
Published On

नवी दिल्ली : टाटा सन्सनचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालायात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रतन टाटा यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी यांच्यासहित उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

 दानशूर, उद्योग क्षेत्रातील बापमाणूस...! रतन टाटा यांना पंतप्रधान मोदींसह मान्यवरांकडून श्रद्धांजली
Ratan Tata Love Life: भारत-चीन युद्धानं मोडलं रतन टाटा यांचं लग्न; जाणून घ्या भारतीय उद्योगपतीची अधुरी प्रेम कहाणी

रतन टाटा यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी यांच्यासहित अनेक मान्यवरांनी सोशल मीडियावर रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक्स मीडियावर लिहिलं की, 'रतन टाटा हे भारतातील सर्व जुन्या आणि प्रतिष्ठित व्यापारी कुटुंबातील होते. त्यांचं योगदान कधीच विसरू शकत नाही'. तर राहुल गांधी यांनीही एक्सवर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

'रतन टाटा यांनी केवळ व्यवसाय केला नाही, तर मदत आणि समाजसेवा देखील केली. त्यांनी देशातील प्रत्येकांच्या मनात स्थान निर्माण केलं, अशा शब्दात राहुल गांधी यांनी श्रद्धांजली वाहिली.

 दानशूर, उद्योग क्षेत्रातील बापमाणूस...! रतन टाटा यांना पंतप्रधान मोदींसह मान्यवरांकडून श्रद्धांजली
Ratan Tata Successor: रतन टाटा यांचा उत्तराधिकारी कोण असेल? ज्याच्या हातात असेल देशातील सर्वात प्रतिष्ठित समूहाची धुरा

PM मोदींनी वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर म्हटलं की, 'रतन टाटा हे दूरद्ष्टी बिझनेस लीडर, दयाळू व्यक्तिमत्व आणि एक सामान्य व्यक्तिमत्व होतं. त्यांचं कुटुंब हे सर्वात जुनं आणि सर्वाधिक प्रतिष्ठा असणारं होतं. त्यांचं योगदान न विसरणार आहे. विनम्रता, दयाळूपणा आणि समाजाला पुढे नेण्याचा करण्याचा विचार टाटा करायचे.

संरक्षम मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं की, 'रतन टाटा यांच्या निधनाने दु:ख झालं आहे. ते भारतीय उद्योग जगतातील महान नायक होते. त्यांनी देशातील अर्थव्यवस्था, व्यापार, उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलं. त्यांचं कुटुंब, मित्र आमि हितचिंतकाप्रती संवेदना व्यक्त करतो'.

दुर्मिळ रत्न हरपले -मुख्यमंत्री शिंदे

'नैतिकता आणि उद्यमशीलतेचा अपूर्व आणि आदर्श संगम रतन टाटा यांच्या ठायी होतं. टाटा ग्रुपची जबाबदारी यशस्वीरित्या पेलणारे रतन टाटा हे एक जिवंत आख्यायिका होते. रतन टाटा यांनी वेळोवेळी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कणखरपणी टाटा ग्रूपला वेगळ्या औद्योगिक उंचीवर घेऊन गेलाय. टाटा यांना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. रतन टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील,असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. असा माणून पुन्हा होणे नाही, असेही त्यांनी सांगितले.

रतन टाटा यांच्या निधनाने देशाचं मोठं नुकसान - देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. 'अतिशय दुखद घटना घडली आहे. रतन टाटा हे केवळ उद्योगपती नव्हते, तर एक चांगलं व्यक्तिमत्व होतं. टाटा हा ब्रॅड ग्लोबल केला. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून सगळी संपत्ती विश्वस्तमध्ये ठेवली. स्वत पेक्षा समाजासाठी आणि देशासाठी ते जास्त जगले. देशाचं मोठं नुकसान. त्यांची जागा कोणीच भरु शकत नाही. मी त्यांना श्रंद्धांजली अर्पण करतो'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com