RRB NTPC Graduate Recruitment 2026 saam tv
बिझनेस

Railway Recruitment 2026 : रेल्वेत नोकरीची संधी; तब्बल ३५४८ पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

RRB NTPC Graduate Recruitment 2026: तुम्हाला रेल्वेत नोकरी करायची असेल तर सरकार तुम्हाला मोठी सुवर्णसंधी देत आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्जाची प्रोसेस आणि पगाराची माहिती जाणून घेतली पाहिजे.

Sakshi Sunil Jadhav

जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अनेक तरुणांना सरकारी काम करण्याची इच्छा असते. बरेच विद्यार्थी यासाठी विविध परीक्षा देत असतात. त्यांच्यासाठी सरकारने नवी संधी उपलब्ध करून दिली आहे.भारतीय रेल्वेने गैर-तांत्रिक लोकप्रिय श्रेणी (NTPC Graduate) अंतर्गत ही भरती प्रोसेस राबवण्यात येत आहे. दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची मुदत ६ नोव्हेंबर २०२६ आहे.

कोणत्या पदांसाठी भरती होणार?

रेल्वेच्या या भरतीमध्ये एकूण चार प्रकारच्या पदांचा समावेश आहे. त्यामध्ये मालगाडी व्यवस्थापक पदासाठी सर्वात जास्त २७५० रिक्त जागा आहेत. वरिष्ठ लिपिक, टंकलेखक (Typist ) पदासाठी ३७१, कनिष्ठ लेखा सहाय्यक म्हणजेच टंकलेखक पदासाठी ३००, तर मुख्य वाणिज्यिक (Chief Commercial Officer) म्हणजे तिकीट पर्यवेक्षक पदासाठी १२७ जागा आहेत.

पगार किती मिळणार?

निवड झाली की, उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळेल. मुख्य वाणिज्यिक पदासाठी पगार स्तर ६ नुसार दरमहा ३५,४०० रुपये बेसिक सॅलरी असेल. तर मालगाडी व्यवस्थापक, वरिष्ठ लिपिक Typist आणि कनिष्ठ लेखा सहाय्यक Typist या पदांसाठी सॅलरी स्तर ५ नुसार दरमहा २९,२०० रुपये बेसिक सॅलरी असेल. याव्यतिरिक्त नियमानुसार लागू भत्ते मिळू शकतात.

शैक्षणिक पात्रता

रेल्वेच्या भरतीसाठी उमेदवार मान्यताप्त विद्यापीठाचा पदवीधर असणं आवश्यक आहे. अधिसूचनेनुसार १ जानेवारी २०२७ रोजी उमेदवारांचं वय १८ ते ३३ वर्षे हवे. तर यासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. ८ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू झाली आहे. उमेदवारांना ६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येईल.

परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर असून, अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी ९ ते १८ नोव्हेंबरदरम्यान मुदत दिली जाईल. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर अधिसूचना आणि पदनिहाय पात्रता तपासावी. अधिकृत माहितीसाठी RRB वेबसाइट(https://rrb.indianrailways.gov.in) किंवा [ऑनलाइन अर्ज पोर्टल](https://www.rrbapply.gov.in) ला भेट द्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रत्नागिरीकरांसाठी महत्त्वाची बातमी! आजपासून पाणी कपात लागू; 'या' दिवशी राहणार पाणी बंद ? वाचा

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

Maharashtra News Live Update: मीठमुंबरी-बागवाडी जेटीवरील बोटिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Shraddha Dubey: मॉडेलिंगच्या नावाखाली काळा धंदा! ब्लॉगरच्या फ्लॅटवर छापा पडताच समोर आला धक्कादायक प्रकार

ज्ञानेश कुमारांना सोडणार नाही! सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार; राहुल गांधींचा सर्वात मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT