Railway Recruitment Saam Tv
बिझनेस

Railway Recruitment: रेल्वेत १९ हजार पदे भरणार; एका आठवड्याच्या आत भरती प्रक्रिया पूर्ण होणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रेल्वेमध्ये भरती होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी अनेकजण फार आधीपासूनच मेहनत घेत असतात. रेल्वेमध्ये लोको पायलट, टेक्निशियन या पदासाठी भरती असते. रेल्वेमध्ये भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलटच्या भरतीसाठी मोठी घोषणा केली आहे. रेल्वेत एएलपी पदांच्या भरतीची संख्या वाढवली आहे. याअंतर्गत १८,७९९ लोको पायलटची भरती करण्यात येणार आहे. याआधी ५६९८ असिस्टंट लोको पायलट पदांसाठी भरती होत होती. पश्चिम बंगालमध्ये कांचनगंगा ट्रेन दुर्घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

एएलपी (Assistant Loco Pilot) भरती प्रक्रिया १ आठवड्यात पूर्ण करावी, अशा सूचना रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वे महाव्यवस्थापकांना दिली आहे. लोको पायलटचा भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ही दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाचे संचालक विद्याधर शर्मा यांनी ही माहिती दिली आहे.

एएलपी पदांची संख्या का वाढवण्यात आली

रेल्वे बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन चालवण्याची ड्युटी नऊ तासांची असते. मात्र, रेल्वेकडे लोको पायलटची कमतरता असल्याचे लोको पायलटला १०-१२ तास ड्युटी करावी लागते. तसेच अनेक लोको पायलट १२-२६ तास ट्रेन चालवतात. त्यामुळे रेल्वे अपघात होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: विधानसभा निवडणुकांनंतर NDAला हादरा! नितीश कुमार देणार 'जोर का झटका', नेमकं राजकारण काय?

Marathi News Live Updates : शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्या विहिरीत पडला

Shani Nakshatra Parivartan: पुढील २ महिने 'या' राशींची चांदीच चांदी! शनिदेवाच्या कृपने प्रगतीसह मिळणार यश

Lapsi Recipe : अस्सल पुणेरी आणि मऊ लापशी; या टिप्सने बनवाल तर लहान मुलं मिनिटांत ताट रिकामं करतील

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस'ची ऑफर स्वीकारणार का? चाहत्यांच्या प्रश्नावर मराठमोळ्या अभिनेत्रीचं एका वाक्यात उत्तर

SCROLL FOR NEXT