Railway New Scheme Saam Tv
बिझनेस

Railway New Scheme: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! आता 20 रुपयांत पोटभर खा, जाणून घ्या कसे

IRCTC Update : भारतीय रेल्वे प्रवाशांना स्वस्त दरात जेवण पुरवणार आहे. यासाठी रेल्वेची नवीन योजना सुरू करण्यात आली आहे.

कोमल दामुद्रे

IRCTC Providing Food Rs. 20 : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता प्रवासादरम्यान ट्रेनमध्ये जेवणासाठी जास्त पैसे खर्च करण्याची गरज भासणार नाही. भारतीय रेल्वे प्रवाशांना स्वस्त दरात जेवण पुरवणार आहे. यासाठी रेल्वेची नवीन योजना सुरू करण्यात आली आहे.

आता प्रवाशांना 20 रुपयांतही पोट भरता येणार आहे. जेवणात उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय अशी दोन्ही पदार्थांची चव चाखता येणार आहे. भारतीय रेल्वेने ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांना २० ते ५० रुपयांमध्ये फूड पॅकेट देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पावभाजी, पुरी-भाजी व्यतिरिक्त, दक्षिण भारतीय पदार्थ देखील ऑर्डरनुसार या पॅकेट्समध्ये सर्व्ह केले जातील. अशा परिस्थितीत रेल्वेच्या या पाऊलामुळे लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो. कारण लांब पल्ल्याच्या प्रवासात ट्रेनमध्ये फक्त खाण्यापिण्यावरच भरपूर पैसा खर्च होतो. आता लोकांना फक्त 20 ते 50 रुपयांत पोटभर जेवण करता येणार आहे.

1. पॅकेटमध्ये किती पदार्थ दिले जातील ?

जर तुम्ही 50 रुपयांची ऑर्डर केली तर तुम्हाला पॅकेटमध्ये 350 ग्रॅमपर्यंतचे अन्न दिले जाईल. त्यात राजमा भात, खिचडी, छोले-भटुरा, छोले भात, मसाला डोसा आणि पावभाजी यापैकी कोणतीही डिश ऑर्डर केल्यास मिळू शकते. यासोबतच रेल्वेने (Railway) आयआरसीटीसी (IRCTC) झोनला पॅकबंद पाणी देण्याचाही सल्ला दिला आहे.

2. 64 रेल्वे स्थानकांची निवड करण्यात आली आहे ?

सध्या ही योजना (Scheme) देशातील 64 रेल्वे स्थानकांवर सुरू होणार आहे. पहिल्यांदा ही योजना ६ महिन्यांसाठी चाचणी म्हणून सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित रेल्वे स्थानकांवर सुरु केली जाईल. यामध्ये सर्वसामान्यांना याचा लाभ होणार आहे. तसेच डब्ब्यातही सर्वसाधारण स्टॉल असतील असे देखील सांगण्यात आले आहे. जेणेकरून प्रवाशांना खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी प्लॅटफॉर्मवर जास्त चालावे लागणार नाही.

3. तुमचे तिकीट 10 मिनिटांनंतर रद्द केले जाईल

त्याचवेळी, रेल्वेशी संबंधित दुसरी सर्वात मोठी बातमी ही आहे की, जर तुम्ही स्टेशनवरून ट्रेन सुटल्यानंतर 10 मिनिटांच्या आत तुमच्या आरक्षित सीटवर पोहोचला नाही, तर तुमचे तिकीट रद्द होऊ शकते. TTE तुमची वाट पाहणार नाही आणि तुमचे तिकीट रद्द केल्यानंतर ती जागा दुसऱ्या प्रवाशाला देण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT