Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरी सोडली;६ महिने स्वतःला बंद करुन घेतले; तिसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS निधी सिवाच यांची सक्सेस स्टोरी

Success Story Of IAS Nidhi Siwach: आयएएस निधी सिवाच यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी नोकरी सोडली. नोकरी सोडल्यानंतर त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्रॅक केली.

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा देऊन अनेकांचे आयएएस होण्याचे स्वप्न असते. अनेकजण नोकरी असतानाही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. परंतु अनेकदा आपल्याला यश येत नाही. खूप कमी तरुणांना पहिल्या प्रयत्नात यश मिळते. असंच काहीच निधि सिवाच यांच्यासोबत झालं.

निधी सिवाच या गुरुग्रामच्या रहिवासी आहेत. त्यांनी २०१५ मध्ये मेकॅनिकल इंजिनियरिंग केले. त्यानंतर त्यांनी टेक महिंद्रा कंपनीत डिझाइनर इंजिनियर म्हणून काम केले. परंतु त्यांना आयुष्यात खूप मोठं व्हायचं होतं. त्यामुळे त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपली नोकरी सोडली आणि पूर्णवेळ अभ्यास केला. त्यांना २०१६ आणि २०१७ मध्येही यूपीएससी परीक्षा दिली होती. परंतु त्यांना यश मिळालं नाही.

२०१८ मध्ये त्यांना यश मिळालं आणि त्या आयएएस अधिकारी झाल्या.२०१६ आणि २०१७ मध्ये त्यांनी नोकरी करत परीक्षेचा अभ्यास केला होता. परंतु त्यांनी २०१८ मघ्ये परीक्षा देण्यासाठी नोकरी सोडली. त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासमोर एक अट ठेवली होती, जर तू अयशस्वी झाली तर तुझं लग्न केलं जाईल. त्यांनी याला एक संधी म्हणून स्विकारलं आणि अभ्यास सुरु केला.

आयएएस निधी सिवाच यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी स्वतः ला ६ महिने एका खोलीत बंद केले होते. त्यांनी आपले लक्ष पूर्णपणे अभ्यासाकडे केंद्रित केली. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी ८३ रँक मिळवली.

निधी सिवाच यांचे एअर फोर्समध्ये जाण्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी एफकॅट परीक्षादेखील दिली होती. परंतु मुलाखतीत त्यांना एका बोर्ड मेंबरने सांगितले की, तु्म्ही डिफेंसमध्ये येण्याऐवजी सिविल सर्व्हिसेस जॉइन करा. यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली अन् घवघवीत यश मिळवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजपची मोठी खेळी! शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याने समर्थकांसह हाती घेतलं 'कमळ'

Morning Breakfast Recipe: नाश्त्याला दररोज मोड आलेले कडधान्ये खाल्ले तर शरीराला काय फायदा होतो?

Maharashtra News Live Update: चुकीच्या पोस्टवर सीईटी कक्ष करणार कायदेशीर कारवाई

Weather Update : पाऊस थैमान घालणार! पुढील ८ तास महत्त्वाचे; १३ राज्यांना अलर्ट जारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, २ महिलेसह चौघांना अटक; दिल्ली कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT